मुंबई -राज्यात शनिवारी ( 6 मार्च 2021) रोजी 1 लाख 13 हजार 669 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या 62 हजार 342 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 45 ते 60 वयोगटातील 11 हजार 241 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
आजपर्यंत राज्यात 17 लाख 44 हजार 724 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात शनिवारी झालेल्या लसीकरणामध्ये 93 हजार 476 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस तर 20 हजार 193 लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. राज्यात शनिवारी 1 लाख 13 हजार 669 जणांना लस देण्यात आली. शनिवारी 10 हजार 904 हेल्थवर्कर तर 8 हजार 989 फ्रंटलाईन वर्कर यांना लशीचा पहिला डोस दिला गेला. तसंच 17 हजार 225 हेल्थ वर्कर आणि 2 हजार 968 फ्रंटलाईन वर्कर यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. तर 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या 62 हजार 342 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.