महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राणीबागेतील वाघाच्या नैसर्गिक अधिवासासाठी सव्वा कोटींचा खर्च; प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीत

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा कायापालट केला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्राणी व पक्षांसाठी नवीन १७ अद्यावत पिंजरे बनवले जात आहेत. बारशिंगा, तरस, कोल्हा आणी त्यानंतर काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधील प्राणिसंग्रहालयातून करिश्मा आणि शक्ती, अशी वाघांची जोडी राणीबागेत दाखल झाली.

भायखळा येथील राणीबाग
भायखळा येथील राणीबाग

By

Published : Feb 24, 2020, 11:08 PM IST

मुंबई - भायखळा येथील राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. राणीबागेतील प्राण्यांना निसर्गरम्य मोकळ्या वातावरणाचा अनुभव यावा म्हणून पिंजऱ्यांमध्ये झाडे, झुडपे, वृक्ष, वेली, पाणथळ, बांबूंचे जंगल बनवून नैसर्गिक अधिवास असलेल्या पिंजर्‍याची निर्मिती करून अनुकूल वातावरण निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी पालिका तब्ब्ल 'सव्वा कोटी रुपये' खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

राणीबागेतील वाघाच्या नैसर्गिक अधिवासासाठी सव्वा कोटींचा खर्च

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचा कायापालट केला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्राणी व पक्षांसाठी नवीन १७ अद्ययावत पिंजरे बनवले जात आहेत. बारशिंगा, तरस, कोल्हा आणी त्यानंतर काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधील प्राणिसंग्रहालयातून करिश्मा आणि शक्ती अशी वाघांची जोडी राणीबागेत दाखल झाली. या वाघाच्या जोडीला सध्या तात्पुरत्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. लवकरच राणीबागेतील मोकळ्या वातावरणातील पिंजर्‍यात त्यांना ठेवले जाणार आहे. वाघाच्या पिंजऱ्याचे काम पूर्ण झाले असून त्यामध्ये वाघाचे नैसर्गिक अधिवास असलेल्या पिंजर्‍याची निर्मिती करून अनुकूल वातावरण निर्मिती केली जाणार आहे. पिंजऱ्याच्या बाहेरच्या भागातल्या उद्यानाचे शुशोभिकरण करून शोभिवंत झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

पिंजर्‍यातील अंतर्गत भागात झाडे, झुडपे, वृक्ष, वेली तसेच बांबूंसह हिरवळ निर्माण करण्यात येणार आहे. एकूण चार हजार चौरस मीटर जागेत हा अधिवास उभारला जाणार आहे. याची देखभाल करण्यासाठी महापालिकेने डी. बी. इन्फ्राटेक या कंत्राटदार कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी १ कोटी ३३ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी येणार आहे. पिंजऱ्यात नैसर्गिक वातावरण करण्यासाठीचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच पर्यटकांना अद्ययावत निसर्गरम्य पिंजऱयातील वाघांना पाहता येणार आहे. प्राण्यांच्या अधिवासामुळे पिंजऱयाच्या आतील बाजूची झाडे, वेली मृत पावण्याची शक्यता आहे. अशावेळी ही झाडे, वृक्षांची लागवड पुन्हा करणे कंत्राटदाराला बंधनकारक असणार आहे.

पुढच्या महिन्यात वाघ पाहता येणार -

गेल्या आठवड्यात औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातून पट्टेदार वाघाची जोडी राणीबागेत आणण्यात आली आहे. चार वर्षांचा नर वाघाचे नाव ‘शक्ती’ आणि मादीचे नाव ‘करिश्मा’ असे आहे. सध्या हे वाघ देखरेखीखाली ठेवण्यात आले असून मार्च महिन्यात पर्यटकांना पाहता येणार आहेत. यामुळे तब्बल १४ वर्षांनंतर पर्यटकांना राणीबागेत पुन्हा वाघ पाहता येणार आहेत.

लवकरच अ‍ॅनाकोंडाही आणणार -

राणीबागेत लवकरच जगात महाकाय म्हणून ओळखला जाणारा अ‍ॅनाकोंडा आणला जाणार आहे. या शिवाय विविध २१ प्रकारचे सापही आणले जातील. यामध्ये नाग, अजगर, तस्कर, मण्यार, धामण, घोणस, मांडूळ, पाणसर्प, फुरसे, हरणटोळ असे देशी तर अ‍ॅनाकोंडा, मॉनिटर लिझार्डसारखे विदेशी सापही आणले जाणार आहेत. यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या मंजुरीसाठी हालचाली सुरू केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा -

'माझ्या आरोपांना उत्तर देताना आमदार राजू कारेमोरे शुद्धीवर नसतील'

ट्रम्प यांच्या दौऱ्यातून भारत-अमेरिका संबंध दृढ होतील - डॉ. शैलेंद्र देवळणकर

ABOUT THE AUTHOR

...view details