कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी "राजं.. मला वाचवा ! पन्हाळा बुरुज (Panhala fort conservation)आणि ऐतिहासिक वास्तूंची दुरावस्था" (Poor condition of historical buildings) या आशयाखाली 'ईटीव्ही भारत'ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर अनेक दुर्गप्रेमी संस्था (Fortress loving organization) तसेच तरुणांकडून (youth initiative) पन्हाळा येथे जनजागृती केली जात आहे. शिवाय जोपर्यंत पन्हाळा गडाच्या संवर्धनाची सुरुवात होत नाही. तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलनाचा इशारा सुद्धा आता देण्यात आला आहे.
एक होता पन्हाळगड ! :दरम्यान, 'एक होता पन्हाळागड' (Panhala fort conservation) अशा टॅगलाईन खाली काही दुर्गप्रेमींनी पन्हाळा गडावर येऊन, हातात फलक घेऊन जनजागृती केली. पन्हाळा गड ढासळत चालला आहे त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. संपूर्ण गडच ढासळल्यावर आम्हाला 'एक होता पन्हाळागड' असेच पुढच्या पिढीला सांगावे लागणार आहे, असेही या दुर्गप्रेमींनी म्हंटले. याकडे प्रशासन लक्ष देणार का? असा सवाल करत संवर्धन होत नाही तोपर्यंत आम्ही अनोख्या पद्धतीने आंदोलन करतच राहणार असल्याचे दुर्गप्रेमींनी म्हंटले.
गड संवर्धनाची मोहीम हाती : दरम्यान, अनेक मोठ्या संघटना, पक्षांचे पदाधिकारी पन्हाळा गडाची ढासळलेली अवस्था पाहून गप्प आहेत. राजकारणासाठी शिवरायांच्या नावाचा सर्रासपणे वापर केला जाईल. मात्र तोच शिवरायांचा गड वाचावा. यासाठी एकही जण पुढे येऊन प्रश्न मांडत नाहीत. अशीच प्रतिक्रिया दुर्गप्रेमी तसेच तरुणांमधून येत आहे. त्यामुळेच आता अनेक तरुण मुलं, दुर्गप्रेमी यांनी पन्हाळा वाचविण्यासाठी गांधीगिरी पद्धतीने विविध मार्गाने प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल. अशा पद्धतीने चळवळ उभी करणार असल्याचे म्हंटले आहे. शिवाय जोपर्यंत आता संबंधित प्रशासनाकडून काहीही ठोस निर्णय येत नाही तोपर्यंत ही मोहीम अशीच सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
वेळीच लक्ष देण्याची गरज : महाराष्ट्रातील महत्वाच्या गडकिल्ल्यांपैकी एक महत्वाचा गड असलेल्या पन्हाळ्याकडे आता प्रशासनासह पुरातत्व विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अनेक ऐतिहासिक बुरुज आणि वास्तू दिवसेंदिवस ढासळत चालल्या आहेत. तर काही ढासळण्याच्या मार्गावर आहेत. नुकतेच चार दरवजा जवळील नेबापुर व मंगळवार पेठ कडे जाण्याच्या पायवाटेच्या मार्गावरील ऐतिहासिक तटबंदीचा काही भाग कोसळला. तर तटबंदीला जागोजागी भेगाही पडल्या आहेत. अनेक ढासळलेल्या वास्तू आहे त्याच परिस्थितीत असून साधा एक दगडही प्रशासनाकडून उचलण्यात आला नाहीये. त्यामुळे 'पन्हाळा गड वाचवा' असेच म्हणण्याची वेळ आता आल्याच्या भावना नागरिकांमधून उमटत आहेत. त्यामुळे पुरातत्व विभागाने तातडीने याकडे लक्ष घालून डागडूजी करून पन्हाळा गडाचे संवर्धन करण्याची गरज आहे.