महाराष्ट्र

maharashtra

'आम्हाला आणखी वाटा पाहायला लावू नका', कोल्हापूरात बंद वाईन शॉपसमोर तळीरामांची विनवणी

दारुची दुकाने उघडण्यासाठी दुकान मालकांनी जय्यत तयारी केली आहे. सकाळपासून ग्रहकांचीही गर्दी झाली आहे. पण उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीची प्रत अद्याप दुकानदारांना मिळालेली नाहीये. शिवाय सर्वच दुकानं उत्पादन शुल्क विभागाने सील केली आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील वाईन शॉप अद्यापही बंद आहेत.

By

Published : May 4, 2020, 5:00 PM IST

Published : May 4, 2020, 5:00 PM IST

wine-shop-remain-closed-in-kolhapur
कोल्हापुरातील वाईन शॉप अद्यापही बंद


कोल्हापूर : दारूचे दुकान सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापुरात सुद्धा दारूची दुकाने सुरू करण्यासंदर्भात काल आदेश जारी केले. मात्र तळीरामांना अजूनही प्रतीक्षेतच राहावं लागणार असल्याची शक्यता आहे. कारण उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीची प्रत अद्याप दुकानदारांना मिळालेली नाहीये. शिवाय सर्वच दुकानं उत्पादन शुल्क विभागाने सील केली आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील वाईन शॉप अद्यापही बंद आहेत.

कोल्हापुरातील वाईन शॉप अद्यापही बंद

दारूची दुकानं सुरू होणार म्हटल्यावर कोल्हापूरातील तळीरामांनी मात्र सकाळी 7 वाजल्यापासूनच दुकानांबाहेर प्रचंड गर्दी केली आहे. शिवाय दुकानदार सुद्धा आता उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशाची वाट पाहत असून त्यानंतरच दुकान उघडली जाणार आहेत. त्यामुळे आज हे आदेश मिळतील आणि दुकान सुरू होतील याची मात्र शक्यता कमी वाटत आहे. दरम्यान, आता आम्हाला आणखीन वाट पाहायला लावू नका आणि लवकरात लवकर दुकानं सुरू करा अशी मागणी ग्राहक करत आहेत.

बहुतांश दारू दुकान मालकांची सुरक्षेच्या दृष्टीने तयारी पूर्ण

सॅनिटायझरचा वापर, सर्व ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग, दूकानाबाहेर ग्राहक सुरक्षित अंतर ठेवून उभे राहावे यासाठी मार्किंग शिवाय राज्य शासनाने दिलेल्या सुचनांचा फलक सुद्धा दुकानांबाहेर लावण्याचे आदेश आहेत त्यानुसार दुकानदारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेत तयारी पूर्ण केली आहे. पण आता दुकानदार दुकान सुरू करण्याच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. काही दुकानदारांनी दुकानाबाहेर सुरक्षारक्षक सुद्धा तैनात केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details