महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shivaji Maharaj Statue Defacement : शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याला बंगळुरूमध्ये जाऊन ठेचू; शिवसेनेचा इशारा

बंगळुरू शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गुरुवारी रात्री विटंबना ( Shivaji Maharaj Statue Defacement ) करण्यात आली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. हे घाणेरडे आणि नीच कृत्य करणाऱ्याला शोधून काढा अन्यथा बंगळुरूमध्ये जाऊन त्याला ठेचून काढू असा इशारा कोल्हापुरातील शिवसैनिकांनी ( Kolhapur Shiv Sena Warning ) दिला आहे.

शिवसेनेचा इशारा
शिवसेनेचा इशारा

By

Published : Dec 18, 2021, 12:20 PM IST

कोल्हापूर : कर्नाटकातील बंगळुरू येथे गुरुवारी रात्री छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना ( Shivaji Maharaj Statue Defacement ) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्यानंतर आता सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, महाराष्ट्रात आता या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत. ज्याने 'ते' घाणेरडे आणि नीच कृत्य केले आहे त्याला तात्काळ शोधून काढा, अन्यथा बंगळुरूमध्ये जाऊन त्याला शोधून ठेचून काढू, असा इशारा शिवसैनिकांनी ( Kolhapur Shiv Sena Warning ) दिला आहे. दरम्यान, घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ सर्वच स्थरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याला बंगळूरमध्ये जाऊन ठेचू; शिवसेनेचा इशारा
काय आहे प्रकरण ?

बंगळुरू येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या अंधारात काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून सीमावाद ( Maharashtra Karnataka Boundaryism ) सुरू आहे. नेहमीच मराठी भाषिक आणि कन्नड भाषिकांमध्ये वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी ( Deepak Dalvi Ink Thrown ) यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या ( Kannad Rakshan Vedike ) काहींनी शाई फेकली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद पाहायला मिळाले. कोल्हापूरातील शिवसैनिकांनी त्यांचा लाल पिवळा ध्वज जाळला त्याचे सुद्धा पुन्हा कर्नाटकात पडसाद उमटले आणि शिवसेनेचा भगवा ध्वज अनेक ठिकाणी जाळण्यात आला. मात्र बंगळुरूमध्ये काही समाजकंटकांनी शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची संतापजनक घटना घडली असून आता महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटत आहेत.

कोल्हापुरात पडसाद

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा रात्रीच्या अंधारात काही समाजकंटकांनी शिवरायांच्या पुतळ्यावर काळा रंग ओतला. बंगळुरूमधील सदाशिवनगर ( Sadashivnagar in Bangalore ) येथे ही संताप आणणारी घटना घडली आहे. कोल्हापूरात शिवसैनिकांनी कर्नाटकच्या लाल पिवळ्या झेंड्याची होळी केली त्यांच्या निषेधार्थ हे कृत्य केले असल्याचे मेसेज सुद्धा व्हायरल होत आहेत. आता या घटनेनंतर त्याचे सर्वत्र पडसाद पाहायला मिळत असून कोल्हापूरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ( Shivsena Agitation Kolhapur ) कानडी लोकांचे व्यवसाय हॉटेल बंद पाडली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details