महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Water Level of Panchganga River : कोल्हापुरातील पंचगंगा नदीची इशारा पातळी गाठायला राहिले केवळ दीड फूट अंतर! - जिल्हाधिकारी राहुल रेखावार

राज्यात अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापुरातदेखील पावसाचा जोर असला, तरी अजून पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली नाही. पंचगंगा नदीची ( Panchganga river in Kolhapur ) पाणीपातळी अजून इशारा पातळीच्याही खाली आहे. सध्याची पंचगंगेची पाणीपातळी 37.8 फूट ( Current Water Level is 37.8 Feet ) इतकी आहे. धरणाची इशारा पातळी 39 फुटांवर असल्याने अजून तरी कुठलाही धोका नाही. तरी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार ( Collector Rahul Rekhawar ) यांनी दिले आहेत.

Panchganga river
पंचगंगा नदी

By

Published : Jul 15, 2022, 11:17 AM IST

कोल्हापूर : कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीची ( Panchganga river in Kolhapur ) पाणीपातळी खूपच संथगतीने वाढत चालली आहे. मागील नऊ तासांत पाणीपातळी केवळ 1 इंचाने वाढली असून, इशारा पातळी गाठायला अजूनही जवळपास दीड फूट बाकी आहे. सध्याची पाणीपातळी 37.8 फूट इतकी ( Current Water Level is 37.8 Feet ) आहे. इशारा पातळी 39 फुटांवर आहे आणि धोका पातळी 43 फुटांवर आहे. पावसाचा जोर जर वाढला तर पुढच्या 10 ते 12 तासांपर्यंत इशारा पातळी गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ( Collector Rahul Rekhawar )


विविध विभागांचे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सज्ज :आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार ( Collector Rahul Rekhawar ) यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील महत्त्वाचे विभाग ज्यामध्ये पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका इत्यादी सर्व महत्त्वाच्या यंत्रणांनी पावसाळा कालावधीमध्ये त्यांच्या विभागामध्ये पूर व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष 24 तास सुरू केला आहे. ( Started 24 Hours Flood Management Control Room )

नागरिकांच्या सोईसाठी यंत्रणा कार्यान्वित : जिल्ह्यातील नागरिकांच्या सोईसाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. नागरिकांना या विभागांशी निगडित माहितीची आवश्यकता असेल, जसे की धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग नद्यांची पाणी पातळी तसेच जिल्ह्यातील कोणते मार्ग सुरू आहेत किंवा कोणते मार्ग बंद आहेत इत्यादी बाबतच्या माहितीसाठी नागरिक या विभागांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतात. या नियंत्रण कक्षांचे दूरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.

आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक -१) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय टोल फ्री क्रमांक - १०७७, दूरध्वनी क्रमांक - २६५९२३२/२६५२९५०/२६५२९५३/२६५२९५४, २) जिल्हा परिषद –आरोग्य २६६१६५३, ३) पोलिस विभाग-२६६२३३३/११२, ४) सार्वजनिक बांधकाम-२६५१४५७, ५) जिल्हा परिषद बांधकाम-९९७५०९८६८९ (सचिन खाडे), ६) राष्ट्रीय महामार्ग- २६५२९६०, ७) पाटबंधारे- २६५४७३६, ८) महावितरण- ७८७५७६९१०३

ABOUT THE AUTHOR

...view details