पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट - पंचगंगा नदीला महापूर
पंचगंगा नदीला महापूर आला होता. महापूर ओसरल्यानंतर पंचगंगा नदीच्या पातळीत कमालीची घट झाली आहे.
पंचगंगा नदी घाट कोल्हापूर
कोल्हापूर - पंचगंगा नदीने जवळपास 57 फुटांची पाणी पातळी गाठली होती. पाच ते सहा दिवसांपासून नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट होत आहे. सध्याची पाणी पातळी 12 फूट 5 इंच इतकी आहे. जिल्ह्यात महापुरानंतर पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. राधानगरी धरणातून सुद्धा होणारा विसर्ग आता बंद झाला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. याबाबत अधिक माहिती दिली आहे, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.