महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रभाग निहाय सुक्ष्म नियोजन करावे : आमदार ऋतुराज पाटील - शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल बातमी

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रभाग निहाय सुक्ष्म नियोजन करावे, असे आमदार ऋतुराज पाटील म्हणाले. ते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत आयोजीत बैठकीत बोलत होते.

Ward wise meticulous planning should be done to bring Corona under control, said MLA Rituraj Patil
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रभाग निहाय सुक्ष्म नियोजन करावे : आमदार ऋतुराज पाटील

By

Published : Jun 1, 2021, 10:21 PM IST

कोल्हापूर - शहर व परिसरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शहरात तसेच गावात प्रभाग निहाय सुक्ष्म नियोजन करावे. याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जिल्हा प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून यापुढेही कार्यरत राहू अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. कोल्हापूर शहर आणि परिसरातील कोरोनाची सद्य स्थिती आणि लसीकरण याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत ते बोलत होते.

शहरासह गावांमध्ये अलगीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत -

बैठकीत बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागामध्ये अनेक गावांनी कोविड सेंटर तसेच संस्थात्मक अलगीकरण सेंटर्स सुरू केले आहेत. ग्रामविकास खात्याच्या आदेशानूसार 15व्या वित्त आयोगातील अबंधित रकमेपैकी 25 टक्के रक्कम कोरोना उपाय योजनांसाठी खर्च करण्यास ग्रामपंचायतींना परवानगी दिली आहे. काही गावामध्ये कोविड सेंटर नाही पण जवळच्या गावामध्ये कोविड सेंटर सुरू आहे. या सेंटरमध्ये जवळपासच्या गावातील रुग्ण उपचार घेत असतात. त्यामुळे जवळपासच्या या गावातील ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातील रक्कम आपल्या भागातील कोविड सेंटरमध्ये खर्च करण्यासाठी परवानगी द्यावी. शहरा शेजारील गावातील लोकांचा शहराशी नोकरी, व्यवसाय व अन्य कामानिमित्त सततचा संपर्क आहे. त्यामुळे या गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करुन कोरोना संदर्भात उपाययोजना कराव्यात. कोरोना रुग्णांची संख्या व सद्य स्थिती विचारात घेता बरेच रुग्ण हे सौम्य लक्षणे असलेले आढळून येत असून ते गृह अलगीकरणात राहण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, त्यांच्या घरामध्ये स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे संसर्ग वाढू नये यासाठी शहर तसेच गावांमध्ये संस्थात्मक अलगीकरण केंद्रांची संख्या वाढविणेसाठी विशेष प्रयत्न करावेत. ज्या मोठ्या गावात रुग्णांची संख्या वाढत आहे त्या ठिकाणी वॉर्ड निहाय समित्या स्थापन करुन सुक्ष्म नियोजन करावे आदी सुचनाही ऋतुराज पाटील यांनी मांडल्या.

हे होते उपस्थित -

या बैठकीस आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, महापालिका आयुक्त‍ निखिल मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारुख देसाई यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

'कोल्हापुरातून शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने करावे लसीकरण' -

कोल्हापूर जिल्ह्यातून शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने करावे, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

'मुंबई-पुण्याच्या धर्तीवर कोल्हापुरात परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे' -

आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी दरवर्षी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत असतात. साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परदेशातील बऱ्याच विद्यापीठांचे शैक्षणिक सत्र सुरू होते. यावर्षी जगातील अमेरिका, इंग्लंड या सारख्या अनेक देशात कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तेथील विद्यापीठांचे ऑफलाईन पध्दतीने शैक्षणिक कामकाज सुरू होणार आहे. कोरोनाच्या सध्याच्या काळामध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच विमान प्रवास तसेच शिक्षणासाठी परदेशात राहण्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात सध्या प्राधान्याने 45 वर्षांवरील नागरीकांनाच लस दिली जात आहे. त्यामुळे परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या या विद्यार्थ्यांना लस मिळत नाही. सध्या मुंबई आणि पुणे या शहरामध्ये परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे पाहून लस दिली जात आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची सुविधा अजून सुरू झालेली नाही. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाखो रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेतलेले असते. त्यामुळे जर लसीकरणा अभावी या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले नाहीत तर त्यांना आर्थिक नुकसानी बरोबरच मानसिक त्राससुद्धा सहन करावा लागणार असल्याचेही पत्रात म्हंटले आहे. शिवाय या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरला सुध्दा अडथळा निर्माण होणार आहे. या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मुंबई आणि पुणेच्या धर्तीवर कोल्हापुरात सुध्दा शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details