महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

40 वर्षे सफाई कर्मचारी म्हणून ज्यांनी काम केले त्याच ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून गावकऱ्यांनी पाठवले - Gram Panchayat members who became cleaners

कोल्हापूर जिल्ह्यातील गड मुडशिंगी गावात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या आजीबाईंना गावकऱ्यांनी सदस्य म्हणून निवडणूक दिले आहे. या आजीबाईं 40 वर्षांपाहून अधिक काळ सफाई कर्मचारी म्हणून काम करत होत्या.

40 वर्षे सफाई कर्मचारी म्हणून ज्यांनी काम केले त्याच ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून गावकऱ्यांनी पाठवले

By

Published : Jan 18, 2021, 7:11 PM IST

Updated : Jan 18, 2021, 8:52 PM IST

कोल्हापूर -ज्या ग्रामपंचायती मध्ये गेली 40 वर्षांहून अधिक वेळ सफाई कर्मचारी म्हणून काम केले त्याच ग्रामपंचायतीमध्ये आता सदस्य म्हणून गावकऱ्यांनी एका आजीबाईंना पाठवले आहे. कोल्हापूरतल्या गड मुडशिंगी गावात ही घटना घडली आहे. या आजीबाईंचे नाव द्रौपदी रामचंद्र सोनूले (वय-72) असे आहे. नागरिकांच्या मोठेपणाची चांगलीच चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. दरम्यान, गावात सलग 15 वर्षे आमच्या गटाकडेच नागरिकांनी सत्ता दिल्याने तानाजीराव पाटील यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत.

40 वर्षे सफाई कर्मचारी म्हणून ज्यांनी काम केले त्याच ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून गावकऱ्यांनी पाठवले

कोण आहेत या आजीबाई ?

द्रौपदी सोनूले या करवीर तालुक्यातील गड मुडशिंगी या गावातील ग्रामपंचायत मध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 45 वर्षांपेक्षाही अधिक वेळ त्या या गावात सफाई कर्मचारी म्हणून सेवा करत आल्या आहेत. मात्र, गावात सफाई कर्मचारी म्हणून इतकी वर्षे सेवा करत असलेल्या द्रौपदी सोनूले आता ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून जाणार असल्याने त्यांना देखील प्रचंड आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे.

महिना 60 रुपये पगार असल्यापासून ग्रामपंचायतीत कार्यरत -

द्रौपदी सोनूले या 45 वसर्षांपासून गावात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. महिना 60 रुपयेच्या आसपास सोनूले यांना पगार होता. अनेक वर्षांपासून त्यांनी गावाची विनातक्रार सेवा केली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनीच आता मतांच्या रूपाने केलेल्या सेवेची परतफेड केली आहे.

'यांनी' दिली उमेदवारी -

द्रौपदी सोनूले यांनी अनेकवर्षं गावाची केलेली सेवा विचारत घेऊन गावातील नेते तानाजी पाटील यांनी त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गावासाठी आपले योगदान दिले आहे. त्याचा आपण सन्मान केला पाहिजे असे म्हणत उमेदवारी दिली आणि गावकऱ्यांनी सुद्धा त्याचे स्वागत करत द्रौपदी सोनूले यांना भरगोस मत देत निवडून दिले.

माजी सरपंचांच्या पत्नीचा केला पराभव -

द्रौपदी सोनूले यांनी गावातील एका मोठ्या पुढाऱ्याच्या म्हणजेच माजी सरपंचांच्या पत्नीचा पराभव केला आहे. त्यामुळे त्याचे सुद्धा सर्वत्र कौतुक होत आहे. शिवाय गावकऱ्यांनी सुद्धा नेता न बघता ज्यांनी गावाची इतकी वर्षे सेवा केली आहे त्याला ही संधी दिली आहे. त्यामुळे गड मुडशिंगी गावाची संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.

Last Updated : Jan 18, 2021, 8:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details