कोल्हापूर काँग्रेसचे अस्तित्व आता कुठे राहिले Congress Has Lost Its Existence आहे, असे म्हणत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil यांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षासाठी ना नेत्यांना स्वारस्य राहिले आहे, ना पक्ष नेतृत्वाला राहिले आहे. शिवाय पक्षनेतृत्वसुद्धा राहिले नसल्याचे म्हणत इथे फक्त मंत्रिपदासाठी काँग्रेसचे अस्तित्व राहिले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी त्याचबरोबर आई अंबाबाई तसेच जोतिबा दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया Congress has Only Existed Here For Ministerial Posts दिली.
राज्य अधोगतीला जात होते, आता आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू दरम्यान, तत्कालीन ठाकरे सरकारवर निशाणा साधत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्य अधोगतीला जात State was Going Downhill होते. त्यामुळे आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निर्णय घेतला आहे. वाळू माफियांच्या विषयावर बोलताना ते म्हणाले, वाळू माफियांचा उन्माद ही संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. यातून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. याला थांबवण्यासाठी काही धोरण आणावे लागेल. ज्यामुळे अवैध वाळूउपसामधून निर्माण झालेल्या अनैतिक गोष्टी थांबवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.