कोल्हापूर -जिल्ह्यात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीची वाटचाल धोकादायक स्थितीकडे सुरू आहे. सध्या नदीची पातळी ४२.५ फुटांवर आहे. धोकादायक पातळी गाठण्यासाठी केवळ ५ इंच पातळी बाकी आहे. या संपूर्ण परिस्थितीची दृश्य ईटीव्हीच्या प्रेक्षकांसाठी तौफिक मिरशिकारी यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपली आहेत.
पंचगंगा धोकापातळीच्या जवळ, पाहा ड्रोनच्या माध्यमातून कोल्हापूरची पूरस्थिती
पंचगंगा नदी धोका पातळीवरून वाहत आहेत. या पूरस्थितीची दृश्य तौफिक मिरशिकारी यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपली आहेत.
पंचगंगा धोका पातळी जवळ, पहा ड्रोनच्या माध्यमातून कोल्हापूरची पूरस्थिती
राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असून कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने धरण भरले असून, कृत्रिम दरवाज्यातून १४०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
Last Updated : Aug 6, 2020, 6:11 PM IST