महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात व्हेंटीलेटरला आग; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना - कोल्हापूर आयजीएम रुग्णालय

जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील आयजीएम रुग्णालयातील आयसीयू विभागातील व्हेंटिलेटरला आग लागल्याची घटना घडली होती. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग विझवल्याने रुग्णालयातील दुर्घटना टळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, आरोग्य राज्यमंत्र्यांनीही कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

आयजीएम रुग्णालयात व्हेंटीलेटरला आग
आयजीएम रुग्णालयात व्हेंटीलेटरला आग

By

Published : May 12, 2021, 9:13 AM IST

कोल्हापूर: जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील आयजीएम रुग्णालयातील आयसीयू विभागातील व्हेंटिलेटरला आग लागल्याची घटना घडली होती. यावेळी ड्युटीवर असणारे डॉक्टर प्रशांत कुंभार, भरत सोलंकी, आसीम शेख या तिघांनी सतर्कतेने तत्काळ आग विझवली. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. शिवाय एका रुग्णाला तत्काळ दुसरा ऑक्सिजन सिलेंडर लावून त्याचाही जीव वाचवला गेला. त्यांच्या या तत्परतेमुळे आयसीयू विभागातील जवळपास 15 जणांचा जीव वाचला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

आयजीएम रुग्णालयात व्हेंटीलेटरला आग

मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले अभिनंदन

आयजीएम रुग्णालयातील आयसीयू विभागात व्हेंटिलेटरला लागलेली आग ज्या तिघांनी विझवली त्या तिघांचेही सर्वत्र कौतुक करून अभिनंदन केले जात आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सुद्धा त्यांचे कौतुक केले आहे. मागील काही दिवसात राज्यातील रुग्णालयात दुर्घटना घडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आयजीएम रुग्णालयातील मोठी दुर्घटना टळली आहे.

हेही वाचा - मुंबई : महापालिकेने रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटमधील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले

ABOUT THE AUTHOR

...view details