महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Children Vaccination in Kolhapur : कोल्हापुरात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात

आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू ( 15 to 18 years Childrens Vaccination ) झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजमध्येच या वयोगटातील मुलांचे लसीकरण होणार ( Children Vaccination in Kolhapur ) आहे. त्यासाठी सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे.

Children Vaccination in Kolhapur
कोल्हापुरात मुलांचे लसीकरण

By

Published : Jan 3, 2022, 12:45 PM IST

कोल्हापूर - आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू ( 15 to 18 years Childrens Vaccination ) झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजमध्येच या वयोगटातील मुलांचे लसीकरण होणार ( Children Vaccination in Kolhapur ) आहे. त्यासाठी सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. मुले अक्षरशः रांगा लावून लसीकरण करून घेत आहेत. जिल्ह्यात जवळपास अडीच लाखांहून अधिक मुलांचे लसीकरण होणार आहे. दरम्यान, येथील विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू असलेल्या लसीकरणाचा आढावा ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतला आहे.

कोल्हापुरात मुलांच्या लसीकरणाला सुरूवात

जिल्ह्यात 2 लाख 29 हजार मुलांचे होणार लसीकरण -

दरम्यान नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 2 लाख 29 हजार लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. या वयोगटातील मुलं आता शाळा तसेच महाविद्यालय सुरू झाल्याने अनेकांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊनच लसीकरण सुरू झाले आहे. कोल्हापूर शहरात या वयोगटातील तब्बल 28 हजार मुले आहेत. या सर्वांचे देखील लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हे लसीकरण सध्या सुरू झाले आहे.

हेही वाचा -अमरावती जिल्ह्यात सोमवारपासून 15 ते 18 वयोगटांतील मुलांचे लसीकरण; 155 केंद्रांवर दिली जाणार लस

हेही वाचा -Omicron Variant Impact : लहान मुलांच्या लसीकरणासाठी तत्काळ नियोजन करणे आवश्यक - डॉ. अविनाश भोंडवे

ABOUT THE AUTHOR

...view details