महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एकनाथ शिंदे कोल्हापुरात, इतिहासात प्रथमच नगरविकास मंत्र्यांची महापालिकेला भेट - कोल्हापूर महापालिका निवडणूक न्यूज

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एकत्रित विकास नियंत्रण नियमावली च्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे सध्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पोहोचले आहेत. महापालिका कारभार या विभागाची जोडला गेला आहे. त्या विभागाचे नगरविकास मंत्री कोल्हापूर महानगरपालीकेला इतिहासात पहिल्यांदाच भेट देत आहेत.

एकनाथ शिंदे कोल्हापूरात
एकनाथ शिंदे कोल्हापूरात

By

Published : Jan 8, 2021, 1:47 PM IST

Updated : Jan 8, 2021, 2:06 PM IST

कोल्हापूर - नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एकत्रित विकास नियंत्रण नियमावली च्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे सध्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पोहोचले आहेत. महापालिका कारभार या विभागाची जोडला गेला आहे. त्या विभागाचे नगरविकास मंत्री कोल्हापूर महानगरपालीकेला इतिहासात पहिल्यांदाच भेट देत आहेत. आतापर्यंत नगरविकास खाते हे विशेषत: मुख्यमंत्र्यांकडे असायचे. त्यामुळे गेल्या 42 वर्षात एकदाही या खात्याच्या मंत्र्यांनी कोल्हापूर महापालिकेला भेट दिली नव्हती. मात्र, एकनाथ शिंदे हे पहिले नगरविकास मंत्री ठरले आहेत.

एकनाथ शिंदे कोल्हापुरात
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात

हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष; मुलगी असूनही 'ती' करतेय पुरुषांचे काम

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला विशेष महत्त्व

आगामी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये गतवेळी शिवसेनेचे चार नगरसेवक होते. मात्र आता सर्वच पक्षांनी जवळपास वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेतला असल्याने आता पुढील बांधणी सुद्धा सुरू झाली आहे. शिवाय शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडणूक यावे याबाबत सुद्धा सेनेच्या नेत्यांसोबत एकनाथ शिंदे बैठक घेणार असल्याचे समजते.


सायंकाळी एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद

एकनाथ शिंदे आज कोल्हापुरातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार असून सायंकाळी अंबाबाईच्या दर्शनाला सुद्धा ते जाणार आहेत. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठक पार पडल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेचे सुद्धा आयोजन केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


हेही वाचा -पुण्याचा मानबिंदू शनिवार वाडा

Last Updated : Jan 8, 2021, 2:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details