महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Wrestler Death : विजयाची कुस्ती शेवटची ठरली; पंढरपूरच्या पैलवानाचा कोल्हापुरात मृत्यू - विजयाची कुस्ती शेवटची ठरली

पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील मारुती सुरवसे या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू ( Unfortunate death due to heart attack ) झाला आहे.

Maruti Suravse Death
मारुती सुरवसे

By

Published : Oct 4, 2022, 4:16 PM IST

सोलापूर : मृत्यू कुणाला कधी कसा येईल सांगता येत नाही. सध्या तरुणाईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. काल रात्री सर्वांना हदरावणारी एक घटना घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील मारुती सुरवसे या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू ( Unfortunate death due to heart attack ) झाला आहे. त्याचं वय अवघ 22 वर्षे होतं.

मारुती सुरवसे

पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली :मारुती हा कोल्हापूर येथील तालमीत सराव करत होता. काल रात्रीच त्याने कोल्हापुरातील एका गावात विजयी कुस्ती मारली होती, कुस्ती नंतर दोन ते तीन तासानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, आणि त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या जाण्याने संपूर्ण वाखरी गावासह पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मयत मारुतीचे वडील वाखरी येथे शेती करतात. मारुतीला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. कुस्तीमध्ये करियर करण्यासाठी त्याला कोल्हापूर येथील तालमीत सरावासाठी पाठवण्यात आलं होतं. अलीकडील काळात तरूनानं मध्ये हृदयविकाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details