महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पणन विभागाच्या अंतर्गत कृषी कायद्यातील येणाऱ्या मुद्यांना स्थगिती - बाळासाहेब पाटील

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये मोठे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभुमिवर सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मोठी माहिती दिली आहे.

बाळासाहेब पाटील
बाळासाहेब पाटील

By

Published : Dec 6, 2020, 10:05 PM IST

कोल्हापूर - पणन विभागाच्या अंतर्गत केंद्राच्या कृषी कायद्यातील येणाऱ्या मुद्द्यांना स्थागिती दिल्याची माहिती सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये मोठे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या अनेक चर्चा सुरू आहेत. त्यामुळे त्यातून निश्चित मार्ग निघेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बाळासाहेब पाटील

सहकारी संस्थांच्या निवडणुका 6 महिन्यांच्या आत -

यावेळी सहकारी संस्थांच्या लांबलेल्या निवडणुकांबाबत विचारले असता ते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाला निवडणुका लांबविण्याबाबत निर्णय घ्यावा लागला. मात्र 31 डिसेंबरनंतर 6 महिन्याच्या आत या सर्व निवडणुका घेतल्या जातील, अशी माहिती देखील बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

अडचणीत असलेल्या 32 कारखान्यांना कर्जाची हमी-

अडचणीत असलेल्या राज्यातील 32 कारखान्यांना कर्जाची हमी सरकारने दिली आहे. हे कारखाने बंद होऊ नयेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाचे नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे, असे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती वाढवली पाहिजे -

बाळासाहेब पाटील म्हणाले, शरद पवार यांनी आम्हाला काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्वच कारखान्यांनी साखरेचे उत्पादन कमी करून इथेनॉलचे उत्पन्न वाढवण्याची गरज आहे, असे सांगितले होते. सद्या कारखान्यांकडे जुन्या साखरेचा साठा सुद्धा जास्त आहे. त्याचे दडपण कारखानदारीवर आहे. तसेच घेतलेल्या कर्जावर अजून व्याज देखील सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details