महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Grant to Widows : एक पाऊल पुढे! कोल्हापुरातील दोन ग्रामपंचायतींकडून पुनर्विवाहासाठी विधवांना अनुदान जाहीर - पुनर्विवाहासाठी विधवांना अनुदान

विधवा प्रथा बंदी निर्णयाच्याही पुढे जाऊन कोल्हापूर जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींनी विधवा महिलांना पुनर्विवाह करण्यासाठी 11 हजारांचे अनुदानच जाहीर (Grant to Widows for Remarriage) केले आहे. अशा पुनर्विवाहासाठी अनुदान जाहीर करणाऱ्या या देशातील पहिल्या ग्रामपंचायती ठरल्या आहेत.

Grant to Widows
विधवा महिलांना अनुदान

By

Published : Jun 8, 2022, 8:13 PM IST

Updated : Jun 8, 2022, 9:25 PM IST

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीत विधवा प्रथा बंदीचा ऐतिहासिक निर्णय हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला. या निर्णयाची थेट सरकारनेसुद्धा दखल घेत याबाबतचा निर्णय राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी घ्यावा असे आवाहन केले. यानंतर अनेक ग्रामपंचायतींनी विविध निर्णय जाहीर केले. आता या विधवा प्रथा बंदी निर्णयाच्याही पुढे जाऊन कोल्हापूर जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींनी विधवा महिलांना पुनर्विवाह करण्यासाठी 11 हजारांचे अनुदानच जाहीर (Grant to Widows for Remarriage) केले आहे. अशा पुनर्विवाहासाठी अनुदान जाहीर करणाऱ्या या देशातील पहिल्या ग्रामपंचायती ठरल्या आहेत. पाहुयात यावरचाच विशेष रिपोर्ट...

ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा

हेही वाचा -womens equal respect committee : सोनगाव ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीच्या निर्णयासोबत स्थापन केली महिला समान सन्मान समिती

राधानगरी ग्रामपंचायत (Radhanagari Gram Panchayat) आणि शिरोळमधील टाकळी वाडी ग्रामपंचायत (Takali Vadi Gram Panchayat) : शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी आणि राधानगरी या दोन्ही ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करून तेव्हड्यावरच न थांबता एक पाऊल पुढे टाकले आहे. विधवा महिलांना अमेक कार्यक्रमांमध्ये हळदी कुंकवासाठी आमंत्रित करून कृतीद्वारे सन्मान दिला आहे. शिवाय अनेक महिलांना पुनर्विवाह करण्यासाठी अनुक्रमे टाकळीवाडी ग्रामपंचायतने 10 हजार आणि राधानगरी ग्रामपंचायतने 11 हजारांचे अनुदान जाहीर केले आहे. टाकळीवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच बाजीराव गोरे यांच्यासह सरपंच तसेच सदस्यांनी हा निर्णय घेतला तर राधानगरी गावच्या लोकनियुक्त सरपंच कविता शेट्टी यांच्यासह उपसरपंच तसेच सदस्य गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला.

ग्रामपंचायतीचे पत्र

मंदिराच्या जीर्णोद्धार समारंभाप्रसंगी विधवा महिलांचे पूजन : दरम्यान, शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील एका मंदिराच्या जीर्णोद्धार समारंभाप्रसंगी विधवा महिलांचे सुवासिनी म्हणून पूजन करून विधवा प्रथेला मूठमाती देण्यात आली. यामुळे समाजात विधवांना आता कृतीतून सन्मान मिळत असल्याचेही पहायला मिळत आहे. येथील मंदिरात देवीच्या पूजेनंतर सुवासिनी पूजन केले. यामध्ये सुवासिनी सोबत विधवा महिला चंद्राबाई निर्मळे, रेश्मा निर्मळे, सरिता निर्मळे आणि शोभा निर्मळे यांचे पाय पूजन करून, फुले वाहून त्यांना कुंकू हळद लावून त्यांची नारळाने ओटी भरत सन्मान केला.

हेही वाचा -Against Widow Tradition: 29 ग्रामपंचायती विधवा परंपरेविरोधात एकाच दिवशी ठराव घेणार

Last Updated : Jun 8, 2022, 9:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details