महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 16, 2022, 1:28 PM IST

ETV Bharat / city

Cheat in car purchase alleged police कोल्हापुरात कार खरेदीवरून आरटीओ विभागातील 2 लिपिकांनी फसवणूक केल्याचा पोलिसाचा आरोप

कोल्हापूर पोलीस दलातील एका पोलीस Cheat in car purchase alleged police in kolhapur कर्मचाऱ्याची कार खरेदीवरून आरटीओ विभागातील दोघांनी RTO department cheat in car purchase alleged police फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत संबंधित पोलिसाने पोलीस अधीक्षकांसह प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे police from kolhapur alleged of fraud in car purchase तक्रार केली असून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Fraud
Fraud

कोल्हापूरकाही दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलीस दलाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत एका आंतरराष्ट्रीय टोळीला जेरबंद केले होते. यामध्ये तब्बल सव्वा पाच कोटी रुपयांच्या आलिशान महागड्या 31 कार जप्त केल्या होत्या. या कारवाईनंतर कोल्हापूर पोलीस दलाचे संपूर्ण देशभरात कौतुक झाले. या टोळीला अटक तर केली मात्र आता एक नवीनच प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील एका पोलीस Cheat in car purchase alleged police in kolhapur कर्मचाऱ्याची कार खरेदीवरून आरटीओ विभागातील दोघांनी RTO department cheat in car purchase alleged police फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत संबंधित पोलिसाने पोलीस अधीक्षकांसह प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे police from kolhapur alleged of fraud in car purchase तक्रार केली असून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

हेही वाचाVinayak Mete Accident मेटेंच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी

या पोलिसांनी केली प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रारदरम्यान, पोलीस कर्मचारी बाबासो गुलाब मुल्ला यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना एक तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये मुल्ला यांनी प्रदेशिक परिवहन कार्यालयातील दोन वरिष्ठ लिपिकांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की, कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एक वरिष्ठ लिपिक माझ्या ओळखीचे होते. त्यांनी आणि त्यांच्याच एका साथीदार लिपिकाने फायनान्स कंपनीने ओढून आणलेली कार विक्री करण्याबाबत सांगितले. आलिशान कार केवळ 10 लाखांना मिळत असल्याने आपण त्यांना लगेचच सुरुवातीला 6 लाख रुपये दिले आणि गाडी घेतली. गाडी नावावर झाल्यानंतर 4 लाख रुपये द्यायचे ठरले होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी कार पासिंग करून देतो सांगून माझ्याकडून कार घेऊन गेले. दोन दिवसानंतर त्यांच्याकडे कार बाबत विचारणा केली मात्र त्यांनी दिलेली कार चोरीची होती ती पोलिसांनी जप्त केली आहे असे संगितले. त्यानंतर ते माझे पैसे द्यायला टाळाटाळ करत असल्याचे या तक्रारीत मुल्ला यांनी म्हटले आहे. प्रादेशिक परिवहन विभागातील हे दोन्ही लिपिक संबंधित टोळीच्या संपर्कात असून त्यांच्याकडून कार घेऊन त्यांच्या चेसी नंबरमध्ये फेरफार करून त्याची विक्री करत असल्याचेही मुल्ला यांनी म्हटले आहे. त्यामुळे, आता त्यांच्या या तक्रारी नंतर काय कारवाई होणार हे लागणार आहे.

संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का दरम्यान, बाबासो गुलाब मुल्ला यांनी ज्या दोन कर्मचाऱ्यांबाबत तक्रार दिली आहे त्याचे पुरावे तपासून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. शिवाय यांच्याकडे अशा पद्धतीच्या कार विक्रीसाठी येत होत्या ही गंभीर बाब असून, याची सखोल चौकशी व्हावी आणि आपले त्यांच्याकडे अडकलेले 6 लाख रुपये सुद्धा परत मिळावेत, अशी मागणी मुल्ला यांनी केली आहे.

अशी झाली होती जानेवारीमध्ये मोठी कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून यापूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना आरोपी जहीर अब्बास हा आरोपी गुन्ह्यातील चोरलेली गाडी विकण्याकरीता जानेवारी 2022 मध्ये कोदाळी (ता. चंदगड) येथील ग्रीन हील रिसॉर्ट या हॉटेलजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून तेथे सापळा रचून ग्रीन हील रिसॉर्टच्या पार्किंगमध्ये जहीर अब्बास व त्याचे 2 जोडीदार यश देसाई आणि खलीद महंमद सारवान यांना ताब्यात घेतले. तसेच, गुन्ह्यातील चोरीस गेलेली स्वीफ्ट डिझायर गाडीसह इतर राज्यातील चोरीच्या 7 चारचाकी गाड्याही त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आल्या. यानंतर आरोपी खलीद महंमद याची चौकशी केली असता त्याच्याकडून आणखी 5, अशा एकूण 13 चोरीच्या गाड्या जप्त केल्या. या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी यश देसाई याचा चुलता आकाश देसाई हा कर्नाटक राज्यातील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने ग्रीन हील रिसॉर्ट चालवायला घेतले होते. तर आकाश देसाई याचा साथीदार राजकुमारकिरण सिंग, रा. मणिपूर बाहेरील राज्यातील चोरलेल्या चारचाकी गाड्या या आकाश देसाईच्या सहाय्याने नंबर प्लेट बदलून ग्रीन हील रिसॉर्ट येथे आणून ठेवत होता. तसेच या गाड्या जहीर अब्बास आणि खलीद महंमद यांच्या मदतीने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. शिवाय आकाश देसाई याच्या मार्फत विक्री केलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या आणखी 18 चारचाकी गाड्या जप्त केल्या.

पाच कोटींच्यावर मुद्देमाल झाला होता जप्तअटक केलेल्या आरोपींकडून तपासामध्ये इतर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या गाडीसह महाराष्ट्र व इतर राज्यातील एकूण 5,5,50,000 रुपये किंमतीच्या 31 चारचाकी गाड्या जप्त केल्या होत्या. त्यामध्ये फॉरच्युनर 3, इनोव्हा 9, किया सेल्टॉस 3, ह्युंडाई क्रेटा 7, इरटिगा 1, स्कॉर्पिओ 1, ब्रीझा 2, स्विफ्ट डिझायर 5 अशा गाड्या होत्या.

हेही वाचाIndependence Day स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील काही खास बातम्यावर नजर

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details