महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवासी विशेष रेल्वेने आज कोल्हापूरात पोहोचले ; पहा काय होते प्रवाशांचे अनुभव

बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर अनेक प्रवासी  वेगवेगळ्या वाहनांनी कोल्हापूर-सांगली भागात दाखल झाले होते. त्यामुळे आज ज्यावेळी रेल्वे आली त्यावेळी या रेल्वे मध्ये प्रत्यक्ष फक्त दहा ते पंधरा प्रवासी होते. मात्र, या सगळ्यांनी आज कोल्हापूर मध्ये आल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला.

महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवासी विशेष रेल्वेने आज कोल्हापूरात पोहोचले ; पहा काय होते प्रवाशांचे अनुभव

By

Published : Jul 28, 2019, 7:26 PM IST

कोल्हापूर -मुंबईजवळच्या वांगणी मध्ये अडकलेली महालक्ष्मी एक्सप्रेस मधल्या सगळ्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, हेच प्रवासी तब्बल चोवीस तासानंतर आज कोल्हापूर मध्ये दाखल झाले. रेल्वे विभागामार्फत या सगळ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेची सोय करण्यात आली होती. नाशिक कुर्डूवाडी मार्गे ही रेल्वे आज कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर दाखल झाली.

महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवासी विशेष रेल्वेने आज कोल्हापूरात पोहोचले ; पहा काय होते प्रवाशांचे अनुभव

बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर अनेक प्रवासी वेगवेगळ्या वाहनांनी कोल्हापूर सांगली भागात दाखल झाले होते. त्यामुळे आज ज्यावेळी रेल्वे आली त्यावेळी या रेल्वे मध्ये प्रत्यक्ष फक्त दहा ते पंधरा प्रवासी होते. मात्र, या सगळ्यांनी आज कोल्हापूर मध्ये आल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला. या घटनेदरम्यानचे रेल्वेमधील अनुभव अनेकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.

ABOUT THE AUTHOR

...view details