कोल्हापूर : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी राज्यभरासह कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा संप पुकारला आहे. आज (सोमवारी) सकाळपासून कोल्हापूर डेपोमधील बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असाही निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले. नेमकं काय म्हणणे आहे या कर्मचाऱ्यांचे आणि आज कोल्हापूर बसस्थानकावर काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
ST Workers Strike : कोल्हापूरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे ही प्रमुख मागणी आहेच. मात्र, त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा सुद्धा मुद्दा आहे.
अन्यथा कर्मचाऱ्यांच्या रोषाला समोरे जावे लागेल
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे ही प्रमुख मागणी आहेच. मात्र, त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा सुद्धा मुद्दा आहे. या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र शासनाकडून काहीही दखल घेतली नसल्याने संपाचे हत्यार उपसण्याची वेळ आल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. शासनाने आता तरी मागण्या मान्य कराव्यात अन्यथा कर्मचाऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले असा इशारा सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला.