महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लोक कलावंतांनी रोखला पुणे-बंगळुरु महामार्ग ; 4 ऑक्टोबरला विधानभवनावर मोर्चा - protest in kolhapur

कलाकरांना कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी. 30 सप्टेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास 4 ऑक्टोबर रोजी विधानभवनावर आक्रोश मोर्चा काढणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कलाकार महासंघाने दिला आहे.

kolhapur agitation
30 सप्टेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास 4 ऑक्टोबर रोजी विधानभवनावर आक्रोश मोर्चा काढणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कलाकार महासंघाने दिला आहे.

By

Published : Sep 4, 2020, 2:23 PM IST

कोल्हापूर - लॉकडाऊनमुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनलॉक सुरू झाल्यापासून सर्व उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे. वारंवार मागणी करून देखील राज्य सरकार कलाकरांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. याचा निषेध करत आज कलाकारांनी पुणे-बंगळुरु महामार्ग रोखून धरला. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. कलाकरांना कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी. 30 सप्टेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास 4 ऑक्टोबर रोजी विधानभवनावर आक्रोश मोर्चा काढणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कलाकार महासंघाने दिला आहे.

कलाकारांनी पुणे-बंगळुरु महामार्ग रोखला; 4 ऑक्टोबरला विधानभवनावर मोर्चा

महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज कोल्हापुरात पुणे-बंगळुरु महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या संघटनेने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. त्यानंतर एक दिवसाचे ढोल-ताशा आंदोलन देखील या संघटनेने केले. मात्र, याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आज या महासंघाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस व आंदोलनकंर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली. आंदोलनादरम्यान कलाकारांनी रस्त्यावर झोपत आमच्या अंगावर गाड्या घाला, असा पवित्रा घेत राज्य सरकारचा निषेध केला.

आज कलाकारांनी पुणे-बंगळुरु महामार्ग रोखून धरला.

कलाकार गणपतीच्या उत्सवात छोटेमोठे कार्यक्रम करून उदरनिर्वाह करत असतात. त्याचबरोबर लग्न समारंभात आपली कला सादर करत असतात. मात्र अजूनही अशा पद्धतीचे कार्यक्रम करण्यास परवानगी दिली नसल्याने या स्थानिक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जर आपल्या मागण्या त्वरित मान्य केल्या नाही तर याच्या पुढचा आंदोलन तीव्र असेल अशा पद्धतीचा इशारा या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details