महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लॉकडाऊन हटवा, व्यापारी वाचवा.. बुधवारी कोल्हापुरात व्यापाऱ्यांचे आंदोलन - कोल्हापुरात व्यापाऱ्यांचे आंदोलन

व्यापार करण्यास सायंकाळी सहा वाजेपर्यंत परवानगी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी कोल्हापुरातील व्यापारी आपआपल्या दुकानासमोर दहा ते बारा या वेळेत दुकाने बंद ठेवून तीव्र निदर्शने करणार आहेत. अशी माहिती कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.

बुधवारी कोल्हापुरात व्यापाऱ्यांचे आंदोलन
बुधवारी कोल्हापुरात व्यापाऱ्यांचे आंदोलन

By

Published : Jun 8, 2021, 6:52 PM IST

Updated : Jun 8, 2021, 6:59 PM IST

कोल्हापूर -राज्य सरकारच्या विरोधात कोल्हापुरातील व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 'लॉकडाउन हटवा व्यापारी वाचवा, ही टॅगलाईन घेऊन उद्या कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील व्यापारी रस्त्यावर उतरणार आहेत. व्यापार करण्यास सायंकाळी सहा वाजेपर्यंत परवानगी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी कोल्हापुरातील व्यापारी आपआपल्या दुकानासमोर दहा ते बारा या वेळेत दुकाने बंद ठेवून तीव्र निदर्शने करणार आहेत. अशी माहिती कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.


राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना केवळ सात ते दोन या वेळेत व्यापार करण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र याला कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारने निर्बंध शिथील करून व्यापाऱ्यांना सहा वाजेपर्यंत व्यापार करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कोल्हापुरातील व्यापारी संघटनेने केली आहे. त्यासंदर्भात आज जिल्ह्यातील 43 व्यापारी संघटनांची बैठक पार पडली.

बुधवारी कोल्हापुरात व्यापाऱ्यांचे आंदोलन
कोल्हापूर शहरातील सर्व अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंची विक्री उद्या दुपारी बारापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आज कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या बैठकीत घेण्यात आला. उद्या 9 जून रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा या कालावधीमध्ये सर्व व्यापारी सर्व व्यवसाय बंद ठेवून आपल्या दुकानासमोर हातात फलक धरून उभे राहतील. सर्वच दुकाने उघडण्यासाठी परवानगी मिळावी ही प्रमुख मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाणार आहे. या आंदोलनामध्ये किराणा भुसारी, किरकोळ किराणा, दुकानदार, कंज्युमर्स असोशियन, उत्पादक विक्रेते ग्रेन मर्चंट, असोसिएशन यासह मेडिकल दुकानदार असोसिएशन यांचा सहभाग असणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या धर्तीवर कोल्हापूर शहरात व्यापार करण्यास परवानगी द्यावी, तसेच कोल्हापुरात उपचार घेत असलेल्या इतर जिल्ह्यातील रुग्णांना वगळून कोल्हापूर जिल्ह्यातील वर्गवारी करावी, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली आहे. तसेच उद्या होणाऱ्या आंदोलनात 43 संघटना सहभागी होणार असून जिल्ह्यात सर्वच ठिकाणी हे आंदोलन होणार असल्याची माहिती कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.
Last Updated : Jun 8, 2021, 6:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details