कोल्हापूर - पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दूध संघाची म्हणजेच 'गोकुळ'ची पंचवार्षिक निवडणूक पार पडत आहे. कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. आज(26 मार्च) दुसऱ्या दिवशीसुद्धा 7 जणांनी एकूण 11 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 1 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, अशी महिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
हेही वाचा -शासकीय यंत्रणेचा वापर करून पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न - सतेज पाटील
आज उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांची नावं पुढीलप्रमाणे :
1) केरबा भाऊ पाटील (सर्वसाधारण)
2) केरबा भाऊ पाटील (सर्वसाधारण)
3) रामराज भाग्येशराव देसाई-कुपेकर (सर्वसाधारण)
4) रामराज भाग्येशराव देसाई-कुपेकर (सर्वसाधारण)
5) रुपाली तानाजी पाटील (महिला राखीव)
6) रुपाली तानाजी पाटील (महिला राखीव)
7) शुभांगी प्रतापसिंह पाटील (महिला राखीव)
8) तानाजी कृष्णात पाटील (इतर मागासवर्गीय)
9) जीवन पांडुरंग पाटील (सर्वसाधारण)
10) विजय भाऊसाहेब देसाई (सर्वसाधारण)
11) विजय भाऊसाहेब देसाई (सर्वसाधारण)
हेही वाचा -'अपक्ष आमदारांना ''त्या'' देत होत्या कोट्यवधींची ऑफर'