कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच रुग्णांच्या मृत्यूमध्येही खूपच वाढ होत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मंगळवारी कोल्हापुरात तब्बल 35 जणांचा मृत्यू झाला. तर 24 तासात 717 नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 556 जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे.
सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजार 875 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 64 हजार 634 इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 64 हजार 634 वर पोहोचली आहे. त्यातील 54 हजार 613 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 875 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 2 हजार 116 झाली आहे.