कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाने अक्षरशः कहर सुरू केला आहे. गेल्या 24 तासात तर कोल्हापुरात उच्चांकी 53 जणांचा मृत्यू झाला असून 1553 नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 1018 जणांना डिस्चार्जसुद्धा देण्यात आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्यासुद्धा 10 हजार 274 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 73 हजार 381 इतकी झाली आहे.
हेह वाचा -कोरोनाला हरवायला लसच आपल्याला मदत करेल, घरी पोहोचताच धवनने गाठलं लसीकरण केंद्र
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 73 हजार 381 वर पोहोचली आहे. त्यातील 60 हजार 674 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार 274 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 2 हजार 460 झाली आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -