कोल्हापूर : राज्यसभेच्या निवडणुकीवरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. संभाजीराजे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवावी असे सेनेकडून सांगण्यात आले होते मात्र आपण कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेणार नाही. सर्वजण छत्रपती घराण्याचा सन्मान करतील असे संभाजीराजे यांनी म्हंटले होते. शिवाय आपले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याबाबत सविस्तर चर्चा झाली असून सर्वकाही ठरले आहे असेही ते म्हणाले होते. मात्र शिवसेनेने आपल्या भूमिकेवर ठाम राहत कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेसाठी दिलेल्या या उमेदवारीनंतर अनेक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, कोण आहेत संजय पवार जवर एक नजर..
तीन वेळा नगरसेवक ते थेट राज्यसभेची उमेदवारी सेनेचा बुलंद आवाज म्हणून विशेष ओळख -शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून संजय पवार यांची कोल्हापूरात ओळख आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत आहेत. आपल्या या जिल्हाप्रमुख पदाच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत अनेक आंदोलने, मोर्चाचे नेतृत्व केले आहे. तीन वेळा नगरसेवक ते थेट राज्यसभेची उमेदवारी 33 वर्षांपासून शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते; तीन वेळा नगरसेवक -संजय पवार हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते मानले जातात. शिवसेना म्हटले की संजय पवार हा चेहरा नेहमीच समोर येत असतो. याच संजय पवारांनी 1989 साली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक आंदोलने मोर्चे यामध्ये हिरीरीने सहभाग नोंदवला. पुढे त्यांनी आपल्या कामातून स्वतःचे एक वेगळं नाव जिल्हाभर केले. त्यानंतर ते तीन वेळा कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून सुद्धा राहिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी अनेक विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली मात्र प्रत्यक्षात मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र आता त्यांना थेट राज्यसभेसाठी उमेदवारी देत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिल्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागल्या आहेत. तीन वेळा नगरसेवक ते थेट राज्यसभेची उमेदवारी उद्धव ठाकरे यांच्याशी घनिष्ठ संबंध -संजय पवार हे आपल्या आक्रमक शैलीसाठी विशेष करून ओळखले जातात. त्यांनी येथील सीमाभागातील अनेक आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आहे. शिवाय अनेक आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या याच आक्रमकतेमुळे त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मन जिंकले आहे. त्यांचे ठाकरे कुटुंबियांशी सुद्धा घनिष्ठ संबंध आहेत. आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुद्धा संजय पवार यांच्या कार्याबद्दल विशेष कौतुक करत त्यांचा शिवसेना सन्मान करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.