कोल्हापूर - पुणे बेंगलोर महामार्गावर झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू झाला ( Three killed in Accident Kolhapur ) आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या किणी टोल नाका जवळ ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. या अपघातात कर्नाटकातल्या बेंगलोर येथील तिघांचा मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली ( Pune Bangalore highway accident kolhapur ) आहे. एक्सल तुटल्याने महामार्गावरच लावलेल्या कंटेनरमुळे हा भीषण अपघात झाला. वडगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंद कंटेनर महामार्गावरच केला उभा - मिळालेल्या माहितीनुसार, किणी टोल नाका परिसरात पुणे बंगलोर महामार्गावर शुक्रवारी रात्री MH 11 CH 2779 क्रमांकाचा कंटेनर बंद पडला होता. त्यामुळे त्यांनी महामार्गावरच बंद अवस्थेत लावला होता. याच कंटेनरच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर किंव्हा टेल लाईट आदी काहीही लावले नसल्याने मागून आलेली महिंद्रा XUV गाडीने जोरदार धडक दिली. याच गाडीच्या मागे असलेल्या KA 27 B 4544 क्रमांकाच्या ट्रकने सुद्धा मागून धडक दिली. या भीषण तिहेरी अपघातात महिंद्रा XUV गाडीतील तिघांचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मृत तिघेही बेंगलोर मधील आहेत. दरम्यान, या घटनेची नोंद वडगाव पोलिसांत झाली असून कंटेनर चालक आणि ट्रक चालक विरोधात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण बेंगलोर वरून पुण्याच्या दिशेने जात होते.