महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चोरलेले दागिने कोल्हापुरात विक्रीसाठी घेऊन आलेला चोरटा अटकेत; 11 गुन्हे उघडकीस - विशाल कुडचे चोर अटक कोल्हापूर

महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरी करणारा आरोपी आज मंगळवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या हाती लागला. त्याच्याकडून तब्बल 11 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून 4 लाख 6 हजार 586 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यासाठी वापरणारी मोटारसायकल जप्त केली.

thief steal Jewelry arrested in kolhapur
विशाल कुडचे चोर अटक कोल्हापूर

By

Published : Mar 1, 2022, 10:38 PM IST

कोल्हापूर - महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरी करणारा आरोपी आज मंगळवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या हाती लागला. त्याच्याकडून तब्बल 11 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून 4 लाख 6 हजार 586 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यासाठी वापरणारी मोटारसायकल जप्त केली. विशाल विलास कुडचे (वय 39 रा. सांगली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा -Situation in Ukraine : युक्रेनमधून सुरक्षित परतलेल्या कोल्हापूरच्या ऋतुजाने सांगितली तेथील थरारक परिस्थिती

कोल्हापुरातल्या गुजरी येथे चोरलेले दागिने विक्रीसाठी घेऊन आला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित चोरटा विशाल विलास कुडचे हा चोरलेले दागिने आज मंगळवारी 1 मार्च रोजी सकाळी कोल्हापुरातील गुजरी येथे एका व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी घेऊन येणार होता, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या परिसरात सापळा लावला. त्यानुसार संबंधित व्यक्ती माहितीनुसार मिळालेल्या वर्णनानुसार मिळतीजुळती असल्याचे दिसताच त्याची अंगझडती घेतली. त्यामध्ये पोलिसांना त्याच्याकडे चार सोन्याच्या चेन, मंगळसूत्र, गंठन, तसेच मोटारसायकल असा मुद्देमाल सापडला. त्याच्याकडून अधिक माहिती घेतली असता त्याने एकूण 11 गुन्ह्यांची कबुली दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरात चेन स्नॅचिंगच्या अनेक घटना

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात चेन स्नॅचिंगच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू होता. मात्र, तपासानंतर मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

हेही वाचा -Raju Shetty Vs Government : आकडेवारीसह स्पष्टीकरण द्या महाराष्ट्राला कळेल चोर कोण आहे - राजु शेट्टी

ABOUT THE AUTHOR

...view details