कोल्हापूर - कोरोनाच्या या महाभयंकर संकटात बळीराजा सुद्धा एक योद्धा म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहे. 20 लाख कोटींचे सरकारने जे पॅकेज जाहीर केले आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागताना दिसत नाही. शेतकरी आणि शेतमजुरांसाठी जाहीर केलेली तरतूद अतिशय नगण्य असून सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच मदत नाही - राजू शेट्टी - राजू शेट्टींची केंद्राच्या पॅकेजवर टीका
20 लाख कोटींचे सरकारने जे पॅकेज जाहीर केले आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागताना दिसत नाही. शेतकरी आणि शेतमजुरांसाठी जाहीर केलेली तरतूद अतिशय नगण्य आहे, असे राजू शेट्टी म्हणाले
![जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच मदत नाही - राजू शेट्टी राजू शेट्टी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7201916-237-7201916-1589479892592.jpg)
निर्मला सितारामन यांनी आज दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत योजनांची घोषणा केली. यावेळी स्थलांतरीत मजूर, मुद्रा लोन, फेरीवाले, आदिवासी आणि लहान शेतकऱ्यांसाठी विविध ९ मदतीच्या घोषणा करण्यात आल्या. यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, योजनांमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांना काहीच मदत यातून होणार नाही. एकीकडे शेतकरी अडचणीत असताना त्यांना काहीतरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, यातून काहीच मिळणार नसल्याचे दिसत आहे.
खरी गरज ग्रामीण भागामध्ये ज्या 'मायक्रो फायनान्स'च्या कचाट्यात शेतमजूर महिला अडकल्या आहेत त्यांना बाहेर काढण्याची होती. त्यांचे व्याज आणि कर्ज माफ करण्याची गरज होती. याबाबत काहीच निर्णय घेण्यात आला नाही. शिवाय शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना चालना दिली असती तर खऱ्या अर्थाने लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्थेला स्थिरता आली असती. पण, जाहीर केलेल्या पॅकेजमधून शेतकऱ्यांना काहीही मिळणार नसल्याचे शेट्टी म्हणाले.