महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Dhairyashil Mane : प्रवाहासोबत जाण्यामध्येच फायदा आहे - धैर्यशील माने - Is Benefit In Going With The Flow

खासदार धैर्यशील माने हे सुद्धा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) गटाला जाऊन मिळणार या चर्चेला पूर्णविराम मिळणारी ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल ( Audio clip viral ) झाला आहे.

Dhairyashil Mane
खासदार धैर्यशील माने

By

Published : Jul 20, 2022, 10:35 AM IST

Updated : Jul 20, 2022, 11:40 AM IST

कोल्हापूर : खासदार धैर्यशील माने हे ( MP Darishsheel Mane ) सुद्धा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) गटाला जाऊन मिळणार या चर्चेला पूर्णविराम मिळणारी ऑडिओ क्लिप ( Darisheel Mane audio clip viral ) सध्या व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये धैर्यशील माने हे आमदारांपेक्षा खासदारांचे अनेक प्रश्न आहेत. खासदारांच्या कामाकडे लक्ष नाही म्हणत आता खासदारकीच्या उरलेल्या दोन वर्षात तरी प्रवाहासोबत जाणे फायद्याचे असल्याचे म्हणत आहेत. शिवाय लोकांना आधी काय कामे केली लक्षात राहत नाहीत. मात्र निवडणुकीच्या आधी काय काम केली हे लक्षात राहत असतात. त्यामुळे या काळात आता 2-4 कामांचा मास्टरस्ट्रोक मारता आला तर अधिक चांगले होईल असेही ते यामध्ये बोलले आहेत. शिवाय आमचे दुखणे आम्हालाच माहिती आहे, राहिलेल्या दोन वर्षात काहीच कामे नाही झाले तर अवघड होईल. मात्र आता नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत असून त्याशिवाय आता पर्यायच उरत नसल्याचेही त्यांनी यामध्ये म्हंटले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र यावेत यासाठी मी महिनाभर झटत आहे मात्र काही गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे आम्ही परिस्थितीचे बळी आहोत असेही धैर्यशील माने म्हणाले. त्यांचे हे संभाषण नेमकं काय आहे ऐकूयात.

ऑडिओ क्लिप व्हायरल
हेही वाचा :Shivsena Kolhapur : शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदींचा रेल्वे बोर्डवरील सदस्य पदाचा राजीनामा
Last Updated : Jul 20, 2022, 11:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details