कोल्हापूर -मागील महिना भरापासून मटण दरावरुन निर्माण झालेली कोंडी अखेर फुटली. मटण विक्रेते आणि विविध तालीम संस्था आणि संघटना प्रतिनिधींची संयुक्त बैठक सकाळी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात झाली. त्यात कोल्हापूर शहरात आजपासूनच ४८० रुपये किलो दराने मटण विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापुरात मटण दरावर तोडगा निघाला हेही वाचा -'येथे' मटण ४२५ रुपये किलो; मटण दरवाढी विरोधात अनोखे आंदोलन
बैठकीत सुरुवातीला किमान ५०० रुपये दर मिळावा. नंतर ४९० रुपये दर मिळावा, त्यापेक्षा कमी दराने मटण विक्री परवडणारी नाही, असे खाटीक समाजाच्या प्रतिनिधींनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या संख्यने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी कसबा बावड्यात ४७० रुपये दराने मटण विकले जात असताना कोल्हापुरात का परवडत नाही, असा संतप्त सवाल केला. अखेर ४८० रुपये दराने आजपासूनच मटण विक्री करण्याविषयी या बैठकीत एकमत झाले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन या निर्णयाची माहिती दिली जाणार आहे. संयुक्त समितीने मान्यता दिल्याशिवाय कोल्हापूर शहरात परस्पर मटण विक्रेत्यांनी दरवाढ करायची नाही याविषयीही यावेळी एकमत झाले.
हेही वाचा - कोल्हापुरात मटण दरवाढ आंदोलन तापणार; आंदोलक, विक्रेते आपल्या भूमिकेवर ठाम