महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संशोधनातही भारी कोल्हापुरी..! जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत शिवाजी विद्यापीठातील पाच जणांचा समावेश - कोल्हापूर जिल्हा लेटेस्ट न्यूज

जागतिक दर्जाच्या शास्त्रज्ञांच्या यादीत शिवाजी विद्यापीठाचे नाव लौकिक झाल्याने पुन्हा एकदा देशपातळीवर विद्यापीठाचे महत्व वाढले आहे. कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठात 'स्कोप' या त्यांच्या जर्नल'मध्ये जगातील विविध क्षेत्रातील प्राध्यापकांची आणि संशोधकाची क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात शिवाजी विद्यापीठातील ५ जणांनी आपले स्थान मिळवले आहे.

top-cited scientists
जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत शिवाजी विद्यापीठातील पाच जणांचा समावेश

By

Published : Nov 7, 2020, 5:04 PM IST

Updated : Nov 7, 2020, 5:38 PM IST

कोल्हापूर- विविध क्षेत्रातील जागतिक संशोधक शास्त्रज्ञांच्या क्रमवारीत शिवाजी विद्यापीठातील 5 प्राध्यापकांनी स्थान मिळवले आहे. त्यात प्रा. डॉक्टर पी. एस. पाटील, डॉ.के.वाय, राजापुरे, डॉ.ज्योती जाधव, सचिन भालेकर, डॉ.ए. व्ही मोहोळकर यांचा समावेश आहे. कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठात 'स्कोप' या त्यांच्या जर्नल'मध्ये जगातील विविध क्षेत्रातील प्राध्यापकांची आणि संशोधकाची क्रमवारी जाहीर केली आहे. जागतिक दर्जाच्या शास्त्रज्ञांच्या यादीत शिवाजी विद्यापीठाचे नाव लौकिक झाल्याने पुन्हा एकदा देशपातळीवर विद्यापीठाचे महत्व वाढले आहे.

पाटील यांचे पेपेर रेफर करणाऱ्यांची संख्या जास्त-

कॅलिफॉर्निया तील स्टॅनफोर्ड विद्यापीठ जागतिक शास्त्रज्ञांची यादी जाहीर करत असते. त्यामध्ये प्राध्यापक, संशोधकांनी सादर केलेले संशोधन पेपर आणि या पेपरचा संदर्भ म्हणून किती जणांनी त्याचा संदर्भ वापरला या निकषावर की यादी जाहीर केली जाते. यात शिवाजी विद्यापीठातील पाच प्राध्यापकांनी आपले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे त्यांना जागतिक शास्त्रज्ञांचा दर्जा मिळाला आहे. अल्पाईड फिजिक्स संशोधनात शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रा. पी. एस पाटील यांचा देशात पाचवा, तर जगात 391 वा क्रमांक आहे. त्यांचे संशोधन पेपर 445 प्रसिद्ध झाले आहेत. तर आतापर्यंत 20 हजार पेक्षा जास्त संशोधकाने त्यांचे पेपर रेफर केले आहेत.

जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत शिवाजी विद्यापीठातील पाच जणांचा समावेश

जागतिक स्तरावर शिवाजी विद्यापीठ अग्रकमी -

मटेरियल सायन्स मध्ये डॉ.प्रा. के.वाय. राजापुरे यांचा 32 वा क्रमांक असून त्यांचे संशोधन पेपर 184 आहेत. तर सायटेशन 7 हजार पेक्षा जास्त आहेत. याच विभागातील माजी प्रा. ए.वी राव यांचा 134 वा क्रमांक आहे. जैवतंत्रज्ञान व जीवशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकीय माहिती शास्त्राच्या प्रमुख डॉ. ज्योती जाधव आणि माझी विभाग प्रमुख डॉक्टर संजय गोविलकर यांनी पर्यावरणीय जैवतंत्रज्ञान कंपवत आणि स्मृतीब्रह्म विभागात टॉप 2 स्थान मिळवले आहे. त्यांचे 8000 सायटेशन आहेत. डॉ. सचिन भालेकर यांना संख्यात्मक व संगणकीय गणित क्षेत्रात देशात सातवा तर जगात 218 वा क्रमांक मिळवला आहे. जागतिक स्तरावर शिवाजी विद्यापीठ अग्रकमी राहत असल्याने पुन्हा एकदा विद्यापीठातील गुणवत्ता सिद्ध झाली आहे.


Last Updated : Nov 7, 2020, 5:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details