महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

केंद्रीय पथकाला तीन महिन्यानंतर जाग, नुकसान पाहणीसाठी कोल्हापूरला येणार - Kolhapur to inspect the damage

कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाला अखेर तीन महिन्यानंतर जाग आली आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक (5 ऑक्टोंबर)रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. यामध्ये आठ सदस्यांचा समावेश आहे. तब्बल तीन महिन्यानंतर हे पथक पाहणी करण्यासाठी येत आहे.

केंद्रीय पथकाला तीन महिन्यानंतर जाग, नुकसान पाहणीसाठी कोल्हापूरला येणार
केंद्रीय पथकाला तीन महिन्यानंतर जाग, नुकसान पाहणीसाठी कोल्हापूरला येणार

By

Published : Oct 1, 2021, 12:19 PM IST

कोल्हापूर - पूर नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाला अखेर तीन महिन्यानंतर जाग आली आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक (5 ऑक्टोंबर)रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. यामध्ये आठ सदस्यांचा समावेश आहे. तब्बल तीन महिन्यानंतर पाहणी करण्यासाठी येणारे केंद्रीय पथक आता कशाची पाहणी करणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांतून आणि शेतकर्‍यांतून उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात सुमारे दीड हजार कोटीचे नुकसान

कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन सर्वच नद्यांना महापूर आला आहे. या महापुरात प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीसह अनेक घरेदारे पाण्याखाली गेल्याने अनेकांना त्यांचा आर्थिक फटका बसला आहे. जिल्ह्यात सुमारे दीड हजार कोटीचे नुकसान झाले आहे. मात्र, राज्य शासनाने आतापर्यंत 148 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

तीन महिन्यानंतर काय पाहणी करणार?

यामध्ये अद्याप शेतीला कोणतीच नुकसान भरपाई मिळालेली नाही. जी नुकसान भरपाई दिली ती तुटपुंजी असल्याचे, अनेकांचे मत आहे. मात्र, याला तीन महिने उलटले असताना आता केंद्रीय आपत्ती पथकाला जागा आली आहे. पूर नुकसानी पाहणी करण्यासाठी (5 ऑक्टोंबर)रोजी हे पथक कोल्हापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. केंद्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सहसचिव यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यांची पदक कोल्हापूरला येणार असल्याची माहिती आहे. तीन महिन्यानंतर हे पथक कोल्हापुरात येऊन काय बघणार असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा -नागरिकांनो घाबरू नका, काळजी करू नका, मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूरकरांशी संवाद

ABOUT THE AUTHOR

...view details