कोल्हापूर - आजपासून राज्यभरातील सर्वच नाट्यगृह सुरू झाली आहेत. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये सुद्धा आज याच पार्श्वभूमीवरती आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ कोल्हापुरातील सर्वच रंगकर्मी हाताला काम नसल्याने घरामध्येच होते. मात्र पुन्हा एकदा रंगमंचावरती आपली कला सादर करण्यासाठी सर्व जण सज्ज झाले आहेत. आपली कला सादर करण्यासाठी सर्वजणच आतुर झाले असून रंगमंच तसेच नाट्यगृहात कलाकारांची लगबग सुरू आहे. कशा पद्धतीने दीड वर्षांनंतर नाट्यगृहात वातावरण आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
100 टक्के मर्यादा करावी :
आजपासून राज्यभरातील नाट्यगृह सुरू झाली आहेत, याचा आम्हा सर्वांना मनापासून आनंद होतोय. मात्र शासनाने 50 टक्के आसनव्यवस्था असावी अशी अट घातली आहे. यामध्येसुद्धा शासनाने लवकरच दिलासा देऊन शंभर टक्के मर्यादेत नाट्यगृह सुरू करावीत, अशी मागणी सुद्धा कलाकारांनी 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून व्यक्त केली आहे.