कोल्हापूर- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) सभासदांचा रहावा, दुधाला जास्तीत जास्त दर मिळावा यासाठी पुन्हा एकदा पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे मैदानात उतरल्याचे पाहायला मिळते. गोकुळची वार्षिक सभा बुधवार दिनांक 3 रोजी पार पडणार आहे. यासाठी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे, आवाहन या दोन मंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोकुळची वार्षिक सभा गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोकुळची वार्षिक सभा कागल पंचतारांकित एमआयडीसी परिसरातील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे बुधवारी एक वाजता होणार आहे.
कोल्हापूरच्या दोन मंत्र्यांचा मोर्चा पुन्हा गोकुळकडे, केले 'हे' आवाहन - गोकुळच्या आगामी निवडणुकीची रणनिती
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, 'गोकुळ'ची वार्षिक सभा बुधवार दिनांक 3 रोजी पार पडणार आहे. यासाठी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे, आवाहन पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. गोकुळची वार्षिक सभा कागल पंचतारांकित एमआयडीसी परिसरातील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे बुधवारी एक वाजता होणार आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गोकुळच्या लेखा परीक्षण अहवालात अनेक आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आल्या आहेत. यासाठी सभासदांनी यावर आवाज उठवण्यासाठी गोकुळच्या सभेला उपस्थित राहिले पाहिजे. गोकुळ बचाव कृती समितीच्या माध्यमातून गोकुळचा भ्रष्ट कारभाराबद्दल सातत्याने आवाज उठवण्यात येत आहे. गोकुळ दुध संघ हा सभासदांच्या मालकीचा राहावा आणि दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर मिळावा, यासाठी लढा सुरू आहे. या लढ्याला दूध उत्पादक सभासदांचे आजपर्यंत मोठे पाठबळ मिळाले आहे. सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सत्तारूढ गटाच्या कारभारासंदर्भात जाब विचारण्याची संधी दूध उत्पादक सभासदांना मिळणार आहे. गोकुळीचा ऑडिट रिपोर्ट आणि अहवाल पाहता अनेक आक्षेपार्ह बाबी यामध्ये निदर्शनास आले आहेत. याबाबत सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सभेला उपस्थित राहून याबद्दल सत्तारूढ गटाला जाब विचारला पाहिजे, असे आव्हान या निवेदनाद्वारे या दोन मंत्र्यांनी केला आहे. यासाठी जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित राहून गोकुळ पदाधिकारी व प्रशासनाला जाब विचारला पाहिजे, असे देखील या निवेदनात म्हटले आहे.
आगामी निवडणुकीची रणनिती
कोरोनामुळे एप्रिल महिन्यात होणारी गोकुळची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आल्यामुळे पुन्हा एकदा गोकुळच्या निवडणुकीबद्दल वेध लागले आहेत. यामुळे आतापासूनच विरोधकांनी सत्ताधार्यांच्या विरोधात रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोकुळीचा वाद उफाळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - अर्थसंकल्पीय अधिवेशन : संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर; प्राप्तीकरात दिलासा नाहीच