महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जिल्ह्यातील 10 हजारांहून अधिक सलून अद्याप बंद; नाभिक समाजाने सरकारला दिला 'हा' इशारा.. - कोल्हापूर सलून बातमी

प्रशासन आमच्यावर दडपशाही करत असल्याचा आरोपसुद्धा यावेळी समाजाच्यावतीने करण्यात आला. कोल्हापुरातील राजारामपुरी येथे हे आंदोलन करण्यात आले. दुकान सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय का नाही? असा सवाल करत येत्या 15 तारखेपर्यंत याबाबत निर्णय घेतला नाही, तर जबरदस्तीने राज्यातील सगळी दुकाने उघडू असा इशारा देण्यात आला आहे.

saloon
जिल्ह्यातील 10 हजारांहून अधिक सलून अद्याप बंद

By

Published : Jun 10, 2020, 8:05 PM IST

कोल्हापूर- लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरसुद्धा अनेक दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र सलूनला परवानगी देण्यात आली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 10 हजार 500 दुकानांना अद्याप टाळे आहेत. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नाभिक समाजाने सरकारविरोधात आज आंदोलन केले. काळ्या फिती लावून सरकारच्या नाकर्तेपणाचा यावेळी नाभिक समाजाने निषेध नोंदवला.

जिल्ह्यातील 10 हजारांहून अधिक सलून अद्याप बंद

प्रशासन आमच्यावर दडपशाही करत असल्याचा आरोपसुद्धा यावेळी समाजाच्यावतीने करण्यात आला. कोल्हापुरातील राजारामपुरी येथे हे आंदोलन करण्यात आले. दुकान सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय का नाही? असा सवाल करत येत्या 15 तारखेपर्यंत याबाबत निर्णय घेतला नाही, तर जबरदस्तीने राज्यातील सगळी दुकाने उघडू असा इशारा देण्यात आला आहे. शिवाय यादरम्यान कोणतीही कारवाई झाली तर त्याला आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जर आमच्यावर दडपण आणण्याचा जर कोणी प्रयत्न केल्यास पुढचे दोन महिने बेमुदत दुकान बंद ठेवू असा इशारासुद्धा नाभिक समाजाने दिला आहे. यावेळी कोल्हापूर शहरातील अनेक दुकानदार उपस्थित होते.

धनंजय भालेकर, सलून मालक

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 10 हजार 500 सलून दुकान संपूर्ण जिल्ह्यात आहेत. तर 1165 दुकानं कोल्हापूर शहरात आहेत. यामध्ये जवळपास 40 हजार जण काम करत आहेत. जिल्ह्यातील एकूण दुकानांच्या सरासरी उलाढालीचा विचार केला तर दररोज जवळपास 10 लाखांपर्यंत हा आकडा जातो. छोट्यातला छोटा दुकानदारसुद्धा दररोज 200 ते 300 रुपये मिळतोच, पण गेल्या 2 महिन्यांपासून त्यांचा मुख्य व्यवसायच बंद असल्याने ते आता मोठ्या आर्थिक संकटात आहेत. अनेकांचा तर हा उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत आहे. दोन महिने दुकानचं बंद असल्याने खायचे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

शासनाने काहीतरी ठोस निर्णय घेत आणि नियम, अटी घालून आम्हाला दुकानं सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती नाभिक समाज करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details