कोल्हापूर -तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव हे आज कोल्हापूर दौऱ्यावर (KCR Kolhapur Visit) आले होते. यावेळी त्यांनी सपत्निक श्री. अंबाबाईचे दर्शन (Ambabai Darshan) घेतले. सकाळी अकराच्या दरम्यान त्यांचे विमान कोल्हापूर विमानतळावर लँड झाले, तेथून ते हॉटेल सयाजीकडे गेले होते. तेथे त्यांनी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (KCR Meet DY Patil) यांची भेट घेतली. यावेळी, कोल्हापूर तसेच राज्य आणि देशपातळीवरील अनेक विषयांवर चर्चा झाली..यावेळी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते. या दौऱ्यावेळी केसीआर यांनी मात्र कोणतेही राजकीय विधान केले नाही.
KCR Meet DY Patil : केसीआर यांनी घेतली पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांची भेट - केसीआर डीवाय पाटील भेट कोल्हापूर
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव हे आज कोल्हापूर दौऱ्यावर (KCR Kolhapur Visit) आले होते. यावेळी त्यांनी सपत्निक श्री. अंबाबाईचे दर्शन (Ambabai Darshan) घेतले. तसेच केसीआर यांनी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (KCR Meet DY Patil) यांची भेट घेतली. यावेळी, कोल्हापूर तसेच राज्य आणि देशपातळीवरील अनेक विषयांवर चर्चा झाली.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांची घेतली भेट :के. चंद्रशेखर राव हे आज श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी करवीर नगरीत आले होते. यावेळी विमानतळावरून ते हॉटेल सयाजी येथे गेले. तिथे के. चंद्रशेखर राव यांनी पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांची भेट घेतली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. काही काळ त्यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली.
केसीआर यांनी मातृलिंग मंदिराचे घेतले दर्शन : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (CM K Chandrashekhar Rao) यांनी सपत्नीक अंबाबाईचे दर्शन (Ambabai Darshan) घेतले. आज सकाळी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी अंबाबाई मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर दररोज दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या आरतीलासुद्धा ते थांबले. विशेष म्हणजे, तब्बल पाऊण तासांहून अधिक वेळ ते मंदिरात होते. यावेळी त्यांनी देवीच्या डोक्यावरच वरच्या मजल्यावर असलेल्या मातृलिंग मंदिरात (Matruling Temple) जाऊन दर्शन घेतले आणि त्याची सविस्तर माहितीही घेतल्याचे देवस्थानचे सचिव शिवराज नायकवडे यांनी सांगितले.