महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चारही बाजूने पाण्याने वेढा दिलेले गाव-शहर पूरबाधित ग्राह्य धरा - राजू शेट्टी - kolhapur flood

पूरग्रस्तांना तातडीने धान्य व सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांचेकडे निवेदनाद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे.

By

Published : Aug 3, 2021, 5:18 PM IST

कोल्हापूर -ज्या गावाला व शहरास चारही बाजूने पाण्याने वेढा दिला आहे, अशा गावांना शंभर टक्के पूरबाधित ग्राह्य धरून पंचनामा करण्यात यावा व पूरग्रस्तांना तातडीने धान्य व सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांचेकडे निवेदनाद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचे मोठे नुकसान

निवेदनात म्हटले आहे, की चालू वर्षीच्या अतिवृष्टी व महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील घरांची पडझड व पिकांचे, व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून सध्या या नुकसानीचे शासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. मात्र या पंचनाम्यात अधिकारी अनेक निकष व जाचक अटी सांगून पंचनामे करू लागले आहेत. मुळातच यावर्षीच्या महापुराने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून एका दिवसात पाणीपातळी वाढून गावामध्ये व शहरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना प्रापंचिक व दुकानातून साहित्य बाहेर काढणे अशक्य झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, असेही त्यांनी म्हटले आहे.

शहरी व ग्रामीण असा भेदभाव

शेट्टींनी यावेळी म्हटले, की शासनाच्या सूचनेनुसार अनेक गावे स्थलांतरित झाली आहेत. ग्रामीण भागातील लोकांना स्थलांतरित होत असताना जनावरे, प्रांपचिक साहित्य, तसेच जीवनाश्यक वस्तू सोबत घेऊन वाहतूक करताना प्रति कुटुंबास 15 ते 20 हजार रूपये खर्च करावा लागला आहे. तसेच आजही अनेक कुटुंबातील मालमत्ता वडिलोपार्जित असून त्याचे वाटणीपत्र न झाल्याने स्वतंत्र प्रापर्टी कार्ड निघत नाही. मात्र अशी अनेक कुटूंब आहेत, की जे वडिलोपार्जित मालमत्ता असून विभक्त राहिले आहेत. यामुळे अशा कुटुबांचे पंचनामे करून विभक्त रेशनकार्ड या नियमांवर त्यांचे नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे.

पाठपुराव्याबाबत चर्चा

शहरांमधील अपार्टमेंटमध्ये पाणी आल्यास संपूर्ण अपार्टमेंटला पूरग्रस्त घोषित केले आहे. शहरातील लोकांचे शासनाच्या खर्चाने स्थलांतर केले आहे. शहरी व ग्रामीण असा भेदभाव केल्याने ग्रामीण भागातील जनतेच्या मनात रोष निर्माण होत आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये अनेक घरांचे भाडेपट्टा करार नसतात मात्र अशा घरात पुराचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या घरातील भाडेकरूंनाही सानुग्रह अनुदान देण्यात यावे, ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य करून उर्वरीत मुद्द्यांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची या बैठकीत चर्चा झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details