महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raju Shetti : '...नाहीतर तुमचा कार्यक्रम ओक्के हाय'; राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना आवाहन - स्वाभिमानी शेतकरी संघटना मराठी बातमी

येत्या 13 जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन केले ( swabhimani shetkari sanghatana morcha 13 july kolhapur ) आहे. या मोर्चात कितीही पाऊस असला तरी सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले ( raju shetty appeal farmers join morcha ) आहे.

Raju Shetti
Raju Shetti

By

Published : Jul 10, 2022, 6:42 PM IST

कोल्हापूर - नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान जाहीर करण्यात आले होते. मात्र, अद्यापही सरकारने याबाबत निर्णय घेतला नाहीये. त्यामुळे येत्या 13 जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन केले ( swabhimani shetkari sanghatana morcha 13 july kolhapur ) आहे. या मोर्चात कितीही पाऊस असला तरी सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले आहे. अन्यथा आपला ओकेमध्ये कार्यक्रम होणार आहे, असे शेट्टी यांनी म्हटलं ( raju shetty appeal farmers join morcha ) आहे.

"भाजप, सेना, काँग्रेस राष्ट्रवादी सगळं ओके पण..."? -दरम्यान, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. पण, अद्याप याबाबत काहीही हालचाल होत नसल्याने येत्या 13 जुलै रोजी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करत असताना राजू शेट्टी म्हणाले, भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आताचा शिंदे गट सगळं ओके आहे. मात्र, शेतकऱ्यांचे 50 हजार रुपये कुठे आहेत?. हेच हक्काचे पैसे वसूल करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोर्चात सहभागी व्हावे. अन्यथा आपला कार्यक्रम ओकेमध्ये ठरलेला आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा -Aaditya Thackeray : 'माझ्यावर उगाच खास प्रेम करण्याची...'; अपात्रतेच्या नोटीसीवरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details