कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ( Swabhimani Farmers Association )21 वी ऊस परिषद 15 ऑक्टोबर रोजी होणार ( Swabhimani Farmers Association Council ) आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetty, president of Swabhimani Farmers Association ) यांनी याबाबतची घोषणा केली. नेहमीप्रमाणे जयसिंगपूर येथे विक्रमसिंह क्रीडांगण मैदानावरती ही सभा होणार आहे. तसेच "जागर एफआरपीचा संघर्ष ऊस दराचा" यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात 9 दिवस मोठ्या सभा घेणार असल्याची घोषणाही केली.
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला -यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात Raju Shetty serious allegations against the Mahavikas Aghadi government करून एफआरपीचे तुकडे करण्याचा कायदा करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. महाविकास आघाडी सरकारचा निर्णय तातडीने रद्द करावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी देखील केली आहे. त्यासंदर्भात शिंदे सरकारने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. एकीकडे रासायनिक खतांचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच प्रमाणात एफआरपीमध्ये वाढ झालेली नाही. उलट केंद्र सरकारने एफआरपीचा बेस वाढवून 10.25 टक्क्यांवर वाढवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. एकरकमी एफआरपी हा शेतकऱ्यांचा कायद्याने दिलेला हक्क आहे असे असताना सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये माती कालवली आहे असेही शेट्टी म्हणाले.