महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश'

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणी दरम्यान महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.

सतेज पाटील
सतेज पाटील

By

Published : Jan 18, 2021, 9:41 PM IST

कोल्हापूर - राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणी दरम्यान महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आजच्या निकालातून भाजपची पीछेहाट झाल्याचंही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

सतेज पाटील
भाजपची पीछेहाट -स्थानिक आघाड्याची मिळून ग्रामपंचायत निवडणूक पार पडत असते. मात्र चंद्रकांत पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये किती लक्ष घातले माहिती नाही. कारण एकूणच विचार केला तर भाजपची मोठ्या प्रमाणात पीछेहाट झाल्याचे सुद्धा पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हंटले.कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक फायनल निकाल -433/433
  • राष्ट्रवादी- 134
  • काँग्रेस- 102
  • शिवसेना- 68
  • स्थानिक आघाडी- 72
  • भाजप- 39
  • जनसुराज्य - 18
    433 पैकी 47 ग्रामपंचायती यादी बिनविरोध झाल्या आहेत. त्यांचा समावेश करून जिल्ह्यातील साधारण पक्षनिहाय स्थिती वरील प्रमाणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details