महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापुरातील कुस्ती आखाडे चालू करा, पैलवान ग्रुपची मागणी - कोल्हापूर पैलवान ग्रुप बातमी

अनेक पैलवानांची आर्थिक परिस्थिती नसतानाही ते कुस्तीचा सराव करत आहेत. अशा काळात गेली सहा महिन्याहून अधिक काळ तालमी बंद असल्याने त्याचा परिणाम पैलवानावर होत असल्याने तालीम सुरू करण्याची मागणी केल्याचे यावेळी पैलवान मधुकर चव्हाण यांनी सांगितले.

start kolhapur wrestling arena demand of wrestling group
कोल्हापूर-कुस्ती आखाडे चालू करा, पैलवान ग्रुपची मागणी

By

Published : Oct 8, 2020, 6:58 PM IST

कोल्हापूर - कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून सरकारने जत्रा, यात्रा रद्द करून कुस्तीचे मैदान, आखाडा बंद ठेवले आहेत. याचा मोठा फटका कुस्तीचा सराव करणाऱ्या पैलवानावर झालाय. लॉकडाऊन नंतर देखील या पैलवानांना आपली शरीरयष्टी बळकट ठेवण्यासाठी कसून सराव करावा लागतोय. पण हे करत असताना पैलवानांना लागणारा खुराक न परवडणारा आहे. त्यामुळे नेमकं काय करायचे असा प्रश्न पैलवानांना सतावत आहे. हेच पैलवान आत्ता कुस्तीचे आखाडे सुरू करा, अशी मागणी करत कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याना निवेदन दिले.

कोल्हापुरातील कुस्ती आखाडे चालू करा, पैलवान ग्रुपची मागणी
कोल्हापूर ही राजर्षी छत्रपती शाहूंची भूमी म्हणून ओळखले जाते. शाहू महाराजांनी या ठिकाणी कुस्तीचा पाया रोवला. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून या ठिकाणच्या तालीम बंद आहेत. त्यातच अनेक मल्ल परजिल्ह्यातून आणि परराज्यातून कोल्हापुरात कुस्तीच्या सरावासाठी येत असतात. मात्र, गेली सहा महिन्याहून अधिक काळ तालीम बंद रहिल्याने पैलवानांचा सराव बंद आहे. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून इतर व्यवसाय, त्याचबरोबर हॉटेल, रेस्टॉरंट या सर्व व्यवसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे कुस्ती तालीम सुरू करण्यासही परवानगी मिळण्याची मागणी पैलवान ग्रुपच्या वतीने करण्यात आलीय.

या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना देण्यात आले. अनेक पैलवानांची आर्थिक परिस्थिती नसतानाही ते कुस्तीचा सराव करत आहेत. अशा काळात गेली सहा महिन्याहून अधिक काळ तालमी बंद असल्याने त्याचा परिणाम पैलवानावर होत असल्याने तालीम सुरू करण्याची मागणी केल्याचे यावेळी पैलवान मधुकर चव्हाण यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details