कोल्हापूर- एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून संप ( ST employees agitation in Kolhapur ) पुकारला आहे. आज पुन्हा एकदा एसटी कर्मचारी, श्रमिक संघटना आणि कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्वच एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
राज्यभरातील एसटी सेवा अजूनही मोठ्या प्रमाणात ( Strike on ST services ) ठप्प आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी ( ST Employees suicide ) आत्महत्या केल्या आहेत. मात्र, सरकारला आमच्या मागण्यांचे काहीही देणेघेणे नाही, असा एसटी कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.
अन्यथा कर्मचाऱ्यांच्या रोषाला समोरे जावे लागेल
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या विराट मोर्चाच्या वेळी कर्मचारी म्हणाले, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ही प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचासुद्धा मुद्दा आहे. आम्हाला राज्य सरकारने केलेली वेतनवाढ ( ST employees on Salary hike ) मान्य नाही. त्यामध्ये वाढ व्हावी, या मागणीसाठीही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या मागणीसाठी अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, राज्य सरकारकडून काहीही दखल घेतली नसल्याने संपाचे हत्यार उपसण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा-Goa Election Live Updates : दुपारी एक वाजतापर्यंत 44.62 टक्के मतदान; 40 जागांसाठी चुरशीची लढत
जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन