कोल्हापूर -शहरातील यादव नगरात सहा जणांनी राडा घालत तेरा गाड्या फोडल्याची घटना घडली आहे. सहा तरुण एकत्र येत हातात नंग्या तलवारी घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या हल्ल्यात 13 गाड्यांचे नुकसान झाले असून, यामध्ये दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. ही घटना काल (6 जून) मध्यरात्री घडली आहे. या घटनेने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kolhapur Crime : सहा जणांकडून नंग्या तलवारी नाचवत 13 गाड्यांची तोडफोड; कोल्हापुरातील यादव नगरातील घटना - कोल्हापुरात 13 वाहनांवर तलवारींनी हल्ला
कोल्हापुरातील शहरातील यादव नगरात सहा जणांनी राडा घालत तेरा गाड्या फोडल्याची घटना घडली आहे. सहा तरुण एकत्र येत हातात नंग्या तलवारी घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.
परिसरात तणावाचे वातावरण - काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील यादव नगर परिसरात 6 तरुण एकत्र येत नंग्या तलवारी नाचवत परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षभरातील या परिसरातील ही तिसरी घटना असून, यामध्ये संशयित आरोपी मुजम्मिल कुरणे (वय 35 राहणार यादव नगर कोल्हापूर) व संशयित आरोपी शाहरुख मुराद मोमीन (वय वर्ष 28 राहणार सुभाष नगर) यांच्यासह अन्य 4 जण एकत्र येत परिसरात नंग्या तलवारी नाचवत तब्बल 13 गाड्यांवर हल्ला केला. यामध्ये दुचाकी, तीन चाकी रिक्षा व चारचाकी वाहनांच्या समावेश आहे. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, सध्या यादव नगरात प्रचंड भीतीचे वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर परिसरातील नागरिकांकडून सदर व्यक्तींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.