महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काही दिवसात भाजपाही राणेंना बाजुला करेल; शिवसैनिकांचा हल्लाबोल - bjp leader narayan rane

कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या परिसरातही आज शिवसेनेने नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन केले.

शिवसेना आंदोलन
शिवसेना आंदोलन

By

Published : Aug 24, 2021, 7:07 PM IST

Updated : Aug 24, 2021, 7:21 PM IST

कोल्हापूर -ज्या शिवसेनेने आपल्याला मोठे केले, ज्यांच्यामुळे आपले नाव राज्यात आहे, शिवाय ज्यांच्यामुळे आपण मुख्यमंत्री झाला होतात, त्या शिवसेनेच्या पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्रीपदावर असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याबाबत आपण खालच्या पातळीवर जाऊन बोलत असाल, तर शिवसेना कधीही हे खपवून घेणार नाही, असे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी म्हटले आहे.

'स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलत आले'

राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राज्यात सर्वत्र राणे यांच्या विरोधात वातावरण तापले आहे. शिवाय त्यांच्याविरोधात काही ठिकाणी गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहेत. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या परिसरातही आज शिवसेनेने नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन केले. राणे नेहमी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलत आले आहेत. यानंतर आता भाजपाच राणे यांना बाजूला करेल, असेही यावेळी संजय पवार यांनी म्हटले.

'शिवसेनेमुळे राणे येथपर्यंत पोहोचले हे त्यांनी विसरू नये'

पवार म्हणाले, की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांसाठी दैवत आहेत. मातोश्री आमचे मंदिर आहे आणि याबाबत जर कोणीही येऊन खालच्या पातळीवर बोलत असेल तर आम्ही ते कधी खपवून घेतले नाही आणि कधीही घेणार नाही. त्यामुळे राणे यांना जरा तरी लाज वाटली पाहिजे, असे म्हणत ज्या शिवसेनेने तुम्हाला उच्च पदापर्यंत पोहोचवले होते त्यांच्याबाबत यापुढे काहीही बोलू नका. शिवाय राणे स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसमध्ये गेले आणि आता स्वतःच्या स्वार्थासाठीच भाजपामध्ये गेले आहेत. मात्र भाजपाच आता काही दिवसांनी राणे यांना बाजूला करेल, असेही पवार यांनी म्हटले.

Last Updated : Aug 24, 2021, 7:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details