कोल्हापूर : आम्हाला घरी जेवायला बोलावून खर्च दुसऱ्याकडून करायचा ही राजेश क्षीरसागर ( Rajesh Kshirsagar ) यांची वृत्ती आहे. त्यांनी मला आणि नाना पटोले ( Nana Patole ) यांना घरी जेवायला बोलावले आणि जेवणाचा खर्च हा काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील ( Satej Patil) यांच्याकडून घेतला अशी टीका विनायक राऊत ( Vinayak Raut ) यांनी काल मेळाव्यात केली होती. मात्र याचा स्वतः सतेज पाटील यांनी खुलासा केला असून तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवाय क्षीरसागर यांच्या घरातील जेवणाचा खर्च मी कसा देईल असेही म्हणत विनायक राऊत यांच्या 'त्या' वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे विनायक राऊत कोल्हापूरात येऊन क्षीरसागर यांची चुकीचे सांगून बदनामी करून गेले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. नेमकं काय प्रकरण आहे पाहुयात...
काय म्हणाले होते विनायक राऊत आणि काय आहे नेमकं प्रकरण ?काल कोल्हापुरात पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना नेते विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली होती. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतच बेईमानीची लागलेली कीड मी स्वतः अनुभवली होती असे राऊत म्हणाले. त्याचाच धागा पकडत ते पुढे म्हणाले, आम्हाला घरी जेवायला बोलावून खर्च दुसऱ्याकडून करायचा ही राजेश क्षीरसागर यांची वृत्ती आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीवेळी क्षीरसागर यांनी मला आणि नाना पटोले यांना घरी जेवायला बोलावले आणि जेवणाचा खर्च मात्र काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडून घेतला अशी टीका केली. मात्र सतेज पाटील यांनी यात काहीही तथ्य नसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे राऊत यांनी केलेल्या टिकेकर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे यातून स्पष्ट होत आहे.