महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shiv Sena kolhapur : कोल्हापुरातील शिवसेना कार्यकारिणी बरखास्त; आता सेनेला नवी बळकटी मिळणार! - कार्यकारिणी बैठक कोल्हापूर शिवसेना

कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारिणीत ( Shiv Sena Executive kolhapur ) बदल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच शहरप्रमुख यांच्यासह अनेक पदावरून क्षीरसागर समर्थकांची हकालपट्टी करण्यात आली होती. तर आता जुनी कार्यकारिणीही बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकार परिषद घेत केली आहे.

शिवसेना बैठक कोल्हापूर
शिवसेना बैठक कोल्हापूर

By

Published : Jul 10, 2022, 2:59 PM IST

Updated : Jul 10, 2022, 3:26 PM IST

कोल्हापूर - शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर त्यांचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही दिसत आहे. एकनाथ शिंदेच्या गटात गेलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्या बंडखोरी नंतर कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारिणीत ( Shiv Sena Executive kolhapur ) बदल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच शहरप्रमुख यांच्यासह अनेक पदावरून क्षीरसागर समर्थकांची हकालपट्टी करण्यात आली होती. तर आता जुनी कार्यकारिणीही बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकार परिषद घेत केली आहे.

प्रतिक्रिया देताना शिवसेना कोल्हापूरचे पदाधिकारी

31 ऑगस्ट पूर्वी नवीन कार्यकारिणी होणार घोषित :शिवसेनेमध्ये बंडखोरीनंतर आता उद्धव ठाकरे गटही पुन्हा नवीन पक्ष बांधणीस सुरुवात केली आहे. सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत नव्या कार्यकारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 31 ऑगस्टपर्यंत सर्व पक्षाची पुर्नबांधणी करण्यात येणार असून यामधून शिवसेनेला नवी बळकटी देणार असल्याचे खासदार संजय मंडलिक, शिवसेना जिल्हाप्रमुख, शहर प्रमुखांनी सांगितले आहे.

'राहिले ते सोनं आणि गेले ते बेंटेक्स माल' :बंडखोरी करून गेलेल्या आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर शिवसेनेकडून विरोध होत असून कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी राहिले ते खरं सोनं आणि गेले ते बेंटेक्स माल अशा शब्दात बंडखोरांवर टीका केली आहे. तसेच नवीन कार्यकारणी 31 ऑगस्ट पूर्वी घोषित करण्यात येणार असून कोल्हापुरात पुन्हा पक्ष बांधणीची जबाबदारी आमच्यावर देण्यात आले असून ते आम्ही सक्षमपणे पार पाडू, असेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा -Sanjay Raut On Rebel MLA : आरशात पाहतानाही लाज वाटते, संजय राऊतांचा बंडखोरांवर पुन्हा हल्लाबोल

Last Updated : Jul 10, 2022, 3:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details