कोल्हापूर - सकाळपासून राज्यसभेची शिवसेनेकडून माझ्या नावाची चर्चा आहे, हे मला माध्यमांमधूनच समजले. जर उमेदवारी मिळाली तर ( Honor if Shiv Sena gets Rajya Sabha candidature ) माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मोठा सन्मान असेल. आजपर्यंत केलेल्या कामाची ही मोठी पोचपावती ठरेल. शिवाय राज्यभरातील माझ्यासारख्या सर्वच कार्यकर्त्यांना बळ देणारी बाब असेल, अशी प्रतिक्रिया कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार ( Shiv Sena district chief Sanjay Pawar ) यांनी व्यक्त केली आहे. दूरध्वनीवरून संवाद साधला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली असून उमेदवारी मिळाली तर आदेशानुसार जोरदार तयारी करू, असेही त्यांनी म्हटले आहे.
Shiv Sena Rajya Sabha Candidate Issue :...तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा मोठा सन्मान - संजय पवार - राज्य सभा उमेदवारी वाद
उमेदवारी मिळाली तर ( Honor if Shiv Sena gets Rajya Sabha Candidate ) माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मोठा सन्मान असेल. आजपर्यंत केलेल्या कामाची ही मोठी पोचपावती ठरेल. शिवाय राज्यभरातील माझ्यासारख्या सर्वच कार्यकर्त्यांना बळ देणारी बाब असेल, अशी प्रतिक्रिया कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार ( Shiv Sena district chief Sanjay Pawar ) यांनी व्यक्त केली आहे.

'...तर निवडणूक म्हणून सामोरे जाणार' :जर पक्षाने उमेदवारी दिली तर एक निवडणूक म्हणून नक्कीच समोरे जाईल. समोर संभाजीराजे असतील मात्र आम्हाला संभाजीराजे आणि छत्रपती घरण्याबाबत खूप आदर आहे. तो नेहमीच राहणार, केवळ निवडणूक म्हणून सामोरे जाईल. पक्षाचा जो आदेश येईल तो पाळावा लागेल, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, अद्यापही कोणत्याही प्रकारे अधिकृत घोषणा झाली नाही. शिवाय मला मुंबईकडे येण्यासाठी सुद्धा बोलावणे आले नसल्याचे पवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.