महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kolhapur Shivsainik Protest : प्रकाश आबिटकरांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा; पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट - Chief Minister Uddhav Thackeray

शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रकाश आबिटकर ( rebel MLA Prakash Abitkar ) यांच्या घरावर आज शिवसैनिकांनी मोर्चा ( Sainiks march ) काढला. गद्दारांना थारा नाही असे म्हणत शिवसैनिकांनी आबिटकरांविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. आबिटकर यांच्या घरावर जात असलेल्या शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात यावेळी धक्काबुक्की पहायला मिळाली.

Shiv Sainik march
शिवसैनिकांचा मोर्चा

By

Published : Jun 29, 2022, 3:33 PM IST

कोल्हापूर -शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel MLA Eknath Shinde ) यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या घरावर आज शिवसैनिकांनी मोर्चा ( Sainiks march ) काढला. गद्दारांना थारा नाही असे म्हणत शिवसैनिकांनी आबिटकरांविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. आबिटकर यांच्या घरावर जात असलेल्या शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात यावेळी धक्काबुक्की ( disput between police and shiv Sainik ) पहायला मिळाली. त्याशिवाय बंडखोर आमदरांविरोधात फलक झळकावण्यात आले. गद्दारांना थारा नाही अशा घोषणाही मोर्चेकरांनी दिल्या.

शिवसैनिकांचा मोर्चा

आंदोलणाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त - दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथे आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्या घरावर आक्रमक शिवसैनिकांनी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी त्यांचे समर्थक सुद्धा रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे त्या दोन गटात मोठा राडा पाहायला मिळाला. झालेल्या घटनेनंतर अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याचाच अनुभव लक्षात घेता सकाळपासूनच गारगोटी येथील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शिवसेनेचे बंडखोर आमदारप्रकाश आबिटकर यांच्या घरावर शिवसैनिकांनी काढलेल्या मोर्च्यात पुरूषांसह मोठ्या प्रमाणावर महिलांचाही समावेश पहायला मिळाला. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या समर्थनार्थ फलकबाजी करण्यात आली. जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा -यशवंत सिन्हा यांना पूर्ण मतदान करणारे केरळ एकमेव राज्य

ABOUT THE AUTHOR

...view details