महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kolhapur Sahyadri Video : ये सह्याद्री सांगशील का आमचा राजा कसा होता?; कोल्हापुरातील 'त्या' तरुणाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगला व्हायरल झाला आहे. बेंबीच्या देठापासून एक तरुण सह्याद्री पर्वत रंगांना ओरडून विचारत आहे. ये सह्याद्री सांगशील ( Sahyadri Viral Video kolhapur ) का आमचा राजा कसा होता ? सांगशील का आमचे बाजीप्रभू देशपांडे कसे होते? ज्या छत्रपती शिवरायांच्या तसेच मावळ्यांच्या पराक्रमांमुळे मराठा साम्रास्य उभे राहिले, ज्यांच्यामुळे आजही आपल्याला अनेक गड किल्ले प्रत्यक्षात पाहता येत आहेत.

Kolhapur Sahyadri Video
Kolhapur Sahyadri Video

By

Published : Jul 7, 2022, 3:59 PM IST

Updated : Jul 7, 2022, 4:08 PM IST

कोल्हापूर - सोशल मीडियावर कालपासून एक व्हिडिओ अक्षरशः धुमाकूळ घातल आहे. ज्यामध्ये एक शिवभक्त तरुण जिवाच्या आकांताने, बेंबीच्या देठापासून सह्याद्री पर्वत रंगांना ओरडून विचारत आहे. ये सह्याद्री सांगशील ( Sahyadri Viral Video kolhapur ) का आमचा राजा कसा होता ? सांगशील का आमचे बाजीप्रभू देशपांडे कसे होते? ज्या छत्रपती शिवरायांच्या तसेच मावळ्यांच्या पराक्रमांमुळे मराठा साम्रास्य उभे राहिले, ज्यांच्यामुळे आजही आपल्याला अनेक गड किल्ले प्रत्यक्षात पाहता येत आहेत. त्याच शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती करत असताना केलेल्या अनेक लढाया, अनेक शूरवीरांचे बलिदान या सर्वांचा गडकिल्ल्यांनंतर कोण साक्षीदार असेल तो म्हणजे सह्याद्री डोंगर. याच सह्याद्री डोंगर रांगेला आमचा राजा कसा होता सांग म्हणत असलेला तरुणाचा व्हिडिओ सध्या कोल्हापुरात व्हायरल झाला आहे. संतोष नेताजी माने असे या तरुणाचे नाव आहे. तो मार्केट यार्ड परिसरात राहतो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ



शिवभक्ताचा व्हिडिओ सोशल मीडियावर :संतोष नेताजी माने हा तरुण गेल्या काही वर्षांपासून गडसंवर्धनाचे काम करतो. शाहू टोल नका येथे एक चायनीजचा व्यवसाय करतो. शिवाय सोशल मीडियावर व्हिडिओ बनविण्याची सुद्धा त्याला आवड आहे. दोन दिवसांपूर्वी तो शाहुवाडी तालुक्यात पर्यटनासाठी गेला होता. येथील पावनखिंड येथे गेल्यानंतर त्याने एक व्हिडिओ बनवला. ज्या पावनखिंड येथे बाजीप्रभू देशपांडे आणि 300 मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन घोडखिंड लढवली. त्याच पावनखिंडला आणि सह्याद्रीला आमचा राजा कसा होता ? आमचे बाजीप्रभू कसे होते? आमचे मावळे कसे होते ? म्हणत त्याने व्हिडिओ बनवला. संतोष माने याची पत्नी अर्चना माने यांनी हा व्हिडिओ बनवला. हृदयाला भिडणारा हा व्हिडिओ आता अनेकांच्या मोबाईलवर व्हायरल झालेल्या पाहायला मिळत आहे.


व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांचे फोन मॅसेज : संतोषचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र स्तरातून याचे कौतुक होत असून अनेकांनी संतोषला व्हिडिओ पाहून डोळ्यात अश्रू दाटून आल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा -Heavy Rain In Pune : पुण्यात अतिवृष्टीचा इशारा; उपाययोजनांसह जिल्हा प्रशासन सज्ज

Last Updated : Jul 7, 2022, 4:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details